मुंबई : खेळ कोणताही असो, त्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. क्रिकेटमध्ये काल मॅचविनिंग खेळी करणारा फलंदाज आज शून्यावर बाद होऊ शकतो. आयपीएलमध्ये तर नेहमीच असं घडतं. जरा आयपीएल 2022 कडे पाहा. या स्पर्धेत सध्याचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्सची (CSK) स्थिती चांगली नाही. संघाला 6 सामन्यांत फक्त एकच विजय मिळाला असून या विजयात ज्या खेळाडूची भूमिका सर्वात मोठी होती. त्याने पुढच्या सामन्यात एक मोठू चूका केली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध धडाकेबाज इनिंग खेळणाऱ्या CSK च्या शिवम दुबेने (Shivam Dube) गुजरात टायटन्सविरुद्ध अशी चूक केली, जी पाहून कर्णधार रवींद्र जडेजालाही राग (Ravindra Jadeja Angry) आला आणि तसेच चेन्नईने जवळपास जिंकलेला सामना गुजरातने शेवटच्या षटकात हिसकावून घेतला.
आयपीएलमध्ये रविवारी, 17 एप्रिल रोजी पुण्यात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला शेवटच्या षटकात 3 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने 8 षटकात अवघ्या 48 धावांत गुजरातच्या टॉप ऑर्डरच्या 4 विकेट्स मिळवल्या होत्या. अशा परिस्थितीत डेव्हिड मिलरने एक बाजू लावून धरली होती. त्याने अवघ्या 51 चेंडूत 94 धावांची शानदार आणि स्फोटक नाबाद खेळी खेळली आणि त्याने एक चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. शिवम दुबेने अनवधानाने चूक केली नसती तर डेव्हिड मिलरची ही खेळी खूप लवकर संपुष्टात आली असती.
गुजरातच्या डावाच्या 17 व्या षटकात ही घटना घडली, जेव्हा गुजरातला 24 चेंडूत 52 धावांची गरज होती. ड्वेन ब्राव्होच्या या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर फक्त 2 धावा झाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ब्राव्होने वेग बदलला आणि मिलरने त्यावर मिडविकेटच्या दिशेने शॉट लगावला. चेंडू हवेत मिडविकेटच्या दिशेने उंचावला. त्यावेळी शिवम दुबेला तो चेंडू झेलण्याची सुवर्णसंधी होती. पण चेंडूजवळ येताच दुबे थांबला आणि त्याने चेंडू झेलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी चेंडू एक टप्पा पडल्यानंतर तो पकडला.
दुबेंच्या या चुकीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गोलंदाजी करणाऱ्या ब्राव्होचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. समालोचकही थक्क झाले. चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. त्यानंतर जेव्हा रिप्ले दाखवला गेला तेव्हा सर्वात तीव्र प्रतिक्रिया कॅप्टन जडेजाची दिसली. दुबेने चेंडू झेलण्याचा प्रयत्न केलाच नाही त्यामुळे जडेजाने डोक्यावरील टोपी काढली, रागाच्या भरात तो टोपी खाली फेकणार होता, पण नंतर कसं तरी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं.
पाहा व्हिडीओ
I feel for Jaddu ? #ShivamDube didn’t even attempt that one! But this ain’t as criminal as letting #vijayshankar be a part of the playing XI! @gujarat_titans what were you even thinking? #CSKvsGT pic.twitter.com/4X65j2mBLa
— IPL Fever ? (@kaarthikdas) April 17, 2022
इतर बातम्या