राजकोट | कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर आता ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या घरच्या मैदानात राजकोट इथे शतक ठोकलं आहे. जडेजाच्या कसोटी कारकीर्दीतील हे चौथं ठरलं आहे. जडेजाने चिवट खेळी करत 198 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50.51 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. तसेच जडेजाने टीम इंडिया अडचणीत असताना रोहित शर्मा याला साथ देत द्विशतकी भागीदारी करत डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या 3 फलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय चुकीचा ठरवला. यशस्वी जयस्वाल 10, शुबमन गिल 0 आणि रजत पाटीदार 5 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 33 अशी स्थिती झाली. त्यानंतर टीम इंडिया अडचणीत असताना रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने कॅप्टन रोहितला चांगली साथ दिली.
रोहित आणि जडेजा या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरत धावा केल्या. दोघांनी दोन्ही बाजूने धावा काढणं सुरुच ठेवलं. शक्य तेव्हा मोठे फटके मारले. अशाप्रकारे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर रोहित शर्मा 131 धावांवर आऊट झाला. मात्र तिथून पुढेही जडेजाने जबाबदारीने बॅटिंग करत वैयक्तिक शतक झळकावलं.
जडेजाचं संघर्षपूर्ण शतक
Test Hundred on his home ground!
A hard fought 4th Test ton and second in Rajkot from @imjadeja 👏 👏#INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/osxLb6gitm
— BCCI (@BCCI) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.