RCB Tweet on Shubman Gill : अरेरे गलती से मिस्टेक! आरसीबीनं शुभमन गिलला शतकाच्या शुभेच्छा दिल्या, चुक लक्षात येताच ट्विट हटवलं

| Updated on: Jul 28, 2022 | 12:51 PM

गिलने 90 पेक्षा जास्त धावसंख्या गाठली तेव्हा त्यानं पहिले एकदिवसीय शतक झळकावण्यासाठी काळजीपूर्वक खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अभिनंदनाचा संदेश शेअर केला. हे ट्विट व्हायरल झालं.

RCB Tweet on Shubman Gill : अरेरे गलती से मिस्टेक! आरसीबीनं शुभमन गिलला शतकाच्या शुभेच्छा दिल्या, चुक लक्षात येताच ट्विट हटवलं
शुभमन गिल
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : भारतीय संघानं (Team India) पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धची (Ind Vs WI) एक दिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला. सलामीवीर शुभमन गिल याने (Shubman Gill) संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि तो मालिकावीर ठरला. सोशल मीडियावर अनेकांनी या युवा खेळाडूचे कौतुक केलं. पंजाबचा हा युवा सलामीवीर शुभमन गिलनं मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 98 धावांची सुरेख खेळी केली. त्यानं सुरुवात संथ केली. पण जसजसा सामना पुढे जात होता तसतसा वेग वाढवला. पावसामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. त्यानंतर भारताच्या डावाची 24 षटके पूर्ण झाली. यानंतर सामना 40 षटकांचा करण्यात आला. भारताच्या डावाची 36 षटके पूर्ण झाली तेव्हा पुन्हा पाऊस पडला आणि पाहुण्या संघाचा डाव 3 बाद 225 धावांवर संपुष्टात आला. तेव्हा गिल वैयक्तिक 98 धावांवर खेळत होता. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार वेस्ट इंडिजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले आणि यजमान अवघ्या 137 धावांत सर्वबाद झाले. दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या एका ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या ट्विटची चांगलीच चर्चा देखील झाली. काय झाले ते जाणून घ्या.

गिलने 90 पेक्षा जास्त धावसंख्या गाठली तेव्हा त्याने आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावण्यासाठी काळजीपूर्वक खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीने तिहेरी आकडा ओलांडण्यापूर्वीच या युवा खेळाडूसाठी अभिनंदनाचा संदेश शेअर केला. या सामन्यात गिलने 98 चेंडूत 98 धावांच्या नाबाद खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

आरसीबीचं ट्विट

हे सुद्धा वाचा

आरसीबीच्या ट्विटमध्ये काय?

आरसीबीने ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शुबमन गिलने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याची वेळ यापेक्षा चांगली असू शकत नाही. अप्रतिम चॅम्प. गिल शतक पूर्ण करू शकला नाही पण आरसीबीचे ट्विट व्हायरल झाले. नंतर हे ट्विट फ्रँचायझीने डिलीट केले पण काही युजर्सनी स्क्रीनशॉट घेऊन व्हायरल केले.

गिल वैयक्तिक 98 धावांवर खेळत होता. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार वेस्ट इंडिजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले आणि यजमान अवघ्या 137 धावांत सर्वबाद झाले.दरम्यान, भारताने कॅरेबियन भूमीवर ऐतिहासिक विजय संपादन केला. टीम इंडियानं यजमानांचा त्यांच्याच भूमीवर प्रथमच वनडे मालिकेत 3-0 असा पराभव केला. भारताने याआधी वेस्ट इंडिजमध्ये अनेक मर्यादित षटकांच्या मालिका जिंकल्या आहेत पण त्यांना कधीही व्हाईटवॉश मिळालेला नाही.