Ipl 2024 आधी विराट कोहली याच्याबाबत मोठी अपडेट, नक्की काय झालं?

| Updated on: Mar 17, 2024 | 4:16 PM

Virat Kohli IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सुरुवात 22 मार्चपासून होतेय. मोसमातील सलामीचा सामना हा आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यात होणार आहे. त्याआधी विराट कोहलीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ipl 2024 आधी विराट कोहली याच्याबाबत मोठी अपडेट, नक्की काय झालं?
Follow us on

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. प्रत्येक टीममधील विदेशी खेळाडूही भारतात दाखल झाले आहेत. एकूण 10 संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली अखेर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतात परतला आहे. विराट लवकरच आरसीबीसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे विराट आयपीएलमध्ये खेळणार की नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली होती. विराट दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळेस पत्नी अनुष्कासह लंडनमध्ये उपस्थित होता. अनुष्का आणि विराटला फेब्रुवारी महिन्यात पुत्ररत्नाचा लाभ झाला. विराटने आपल्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलं. तसेच विराटने आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी त्याने सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर अखेर अनेक दिवस लंडमध्ये राहिल्यानंतर विराट एकटाच भारतात परतला आहे. विराटचा भारतात परतल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट आयपीएलसाठी सज्ज

दरम्यान आता विराट आरसीबी टीमसोबत कधीपर्यंत जोडला जाणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र विराट येत्या काही तासांमध्येच आरसीबीच्या गोटात दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विराट कोहली याने आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 14 सामन्यांमध्ये 53.25 च्या सरासरीने 2 शतकं आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 639 धावा केल्या होत्या. त्यामुळे यंदाही विराटकडून आरसीबी चाहत्यांना अशाच झंझावाताची अपेक्षा असणार आहे.

विराट कोहली भारतात दाखल

आयपीएल 2024 साठी आरसीबी टीम | फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली , दिनेश कार्तिक , ग्लेन मॅक्सवेल , विल जॅक्स, मोहम्मद सिराज, अनुज रावत, महिपाल लोमरोर, कॅमरून ग्रीन, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, आकाश दीप, मयंक डागर, रीस टॉपले, कर्ण शर्मा, राजन कुमार, मनोज भंडागे, हिमांशु शर्मा, विजयकुमार विशाक, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, सौरव चौहान आणि स्वप्निल सिंह.