मुंबई : दिल्लीवर पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढावली आहे. बंगळुरुने दिलेलं 175 धावांचं आव्हान गाठताना फलंदाजांची घसरगुंडी सुरु झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. दहा संघांमध्ये पहिल्या दोन संघात स्थान मिळवणं अशक्यप्राय आहे. त्यामुळे पुढचे काही सामने जिंकत गुण आणि स्थान सुधारण्यावर जोर द्यावा लागेल.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला. 175 धावांचं आव्हान गाठताना एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, दिल्लीवर सलग पाच पराभवाची नामुष्की ओढावली आहे. सलग पाच पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे, असंच म्हणावं लागेल. कारण पाच पराभवानंतर गुणतालिका बदलणं आता कठीण आहे. त्यामुळे दिल्ली पहिला संघ या स्पर्धेतून बाहेर गेला असंच चित्र आहे. आता जर तरचं गणित देखील कठीण झालं आहे. कारण इतर नऊ संघाच्या खात्यात चांगल्या धावगतीसह गुण आहेत.
विजयी धावांचा आकडा गाठताना दिल्लीची फलंदाजी सुरुवातीला अडखळली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेला पृथ्वी शॉ स्वस्तात धावचीत झाला. त्यानंतर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर मिशेल मार्श आला आणि 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. तो तंबूत परतत नाही तोच यश धुल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत होत बाद झाला. त्याने 4 चेंडूत अवघी एक धाव केली.
संघावर दडपण असताना डेविड वॉर्नर डाव सावरेल असं वाटत होतं. पण तोही काही खास करू शकला नाही. 13 चेंडूत 19 धावा करून विशाक विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अभिषेक पोरेलकडून अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तोही 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे जोडी जमली. ही जोडी फोडण्यात विशाक विजयकुमारला यश आलं.
अक्षर पटेल 14 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेनं आक्रमक खेळी सुरु ठेवली. अर्धशतक ठोकल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला.
ललित यादवच्या रुपाने दिल्लीला आठवा धक्का बसला. विशाकच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलनं त्याचा झेल घेतला. त्याला अवघ्या चार धावा करता आल्या. अमन खानही काही खास करू शकला नाही. 10 चेंडूत 18 धाव करून बाद झाला.
Match 20. WICKET! 17.3: Aman Khan 18(10) ct Virat Kohli b Mohammed Siraj, Delhi Capitals 128/9 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 15.5: Lalit Yadav 4(7) ct Glenn Maxwell b Vyshak Vijaykumar, Delhi Capitals 110/8 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 13.6: Manish Pandey 50(38) lbw Wanindu Hasaranga, Delhi Capitals 98/7 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Local boy going strong ??#YehHaiNayiDilli #IPL2023 #RCBvDC pic.twitter.com/OE3ldLUdZp
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 15, 2023
Wicket number 2⃣ for Vijaykumar Vyshak ✨
Axar Patel was looking dangerous with the bat but @RCBTweets get his wicket at the right time ?
Follow the match ▶️ https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/u8O4UI0mpU
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 8.5: Abishek Porel 5(8) ct Wayne Parnell b Harshal Patel, Delhi Capitals 53/5 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 5.4: David Warner 19(13) ct Virat Kohli b Vyshak Vijaykumar, Delhi Capitals 30/4 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
A sensational start THAT for @RCBTweets ??#DC are 3⃣ down already in the chase as @mdsirajofficial and @WayneParnell claim a wicket each ??
Follow the match ▶️ https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/ldlMfI7wfn
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 1.4: Mitchell Marsh 0(4) ct Virat Kohli b Wayne Parnell, Delhi Capitals 1/2 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. WICKET! 0.4: Prithvi Shaw 0(2) Run Out Anuj Rawat, Delhi Capitals 1/1 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
दिल्ली कॅपिटल्सने नाणफेक जिंकत बंगळुरु संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. या सामन्यात फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली जोडीने सावध सुरुवात करून दिली. पॉवर प्लेममध्ये चौकार आणि षटकार ठोकत विकेट राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. संघाच्या 42 धावा असताना फाफ डु प्लेसिस बाद झाला. त्याने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली. मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अमिन हकीमनं जबरदस्त झेल घेतला.
विराट कोहलीने एका बाजूने डाव सावरला. आक्रमक फटकेबाजी करत संघासाठी धावा केल्या. 34 चेंडूत त्याने 50 धावांची खेळी केली. ललित यादवच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.
महिपाल लोमरोरही काही खास करू शकला नाही 18 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर थोडा डाव सावरण्याचा ग्लेन मॅक्सवेलनं प्रयत्न केला. पण त्यालाही फार काही करता आलं नाही.
अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हर्षल पटेल बाद झाला आणि त्याच्या पुढचं षटक कुलदीप यादवला सोपण्यात आलं. मग काय पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक खांतही खोलू शकला नाही. आला तसाच माघारी गेला.
आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अपेक्षित धावसंख्या करू शकली नाही. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावसंख्या मंदावली. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी धावा केल्या आणि विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहलीने 34 चेंडूत 50 धावां खेळी केली. आता हे विजयी आव्हान दिल्ली कसं गाठते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
1⃣7⃣5⃣ to post our first win of #IPL2023 ?
Dilliwaalon, ROARS rukne nahi chaiye?#YehHaiNayiDilli #IPL2023 #RCBvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 15, 2023
हर्षल पटेल बाद झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिकही काही खास करु शकला नाही. पहिल्याच चेंडूवर झेल बाद होत तंबूत परतला.
Back at it again and roaring in Bengaluru ?#YehHaiNayiDilli #IPL2023 #RCBvDC pic.twitter.com/5eCLtvCwRd
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 15, 2023
6⃣ & O.U.T ☝️
A successful caught behind review for @DelhiCapitals as Mahipal Lomror departs!#DC have made a fine comeback with the ball here ????
Follow the match ▶️ https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/qStC2GdrVy
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
विराट कोहली 34 चेंडूत 50 धावा करून बाद झाला आहे. ललित यादवच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.
विराट कोहलीने दिल्ली विरुद्ध आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं आहे.
2️⃣5️⃣0️⃣0️⃣ out of the ♾️ reasons why we ❤️ King Kohli! ?
Most by any player at a single venue in the IPL! ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvDC @imVkohli pic.twitter.com/DzWQLsfq8G
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 15, 2023
Match 20. WICKET! 4.4: Faf Du Plessis 22(16) ct Aman Khan b Mitchell Marsh, Royal Challengers Bangalore 42/1 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Match 20. 0.3: Anrich Nortje to Virat Kohli 4 runs, Royal Challengers Bangalore 9/0 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख
Match 20. Delhi Capitals won the toss and elected to field. https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
दिल्ली कॅपिटल्सकडे फलंदाजी आणि गोलंदाजीचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. मात्र एक दोन खेळाडूच परफॉर्म करत असल्याचं चित्र आहे. डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेलनं मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. तर एनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमारनं चांगली गोलंदाजी केली होती. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.
आरसीबीचे टॉप 3 खेळाडू म्हणजेच डुप्लेसिस, कोहली आणि मॅक्सवेल चांगल्याच फॉर्मात आहेत. या व्यतिरिक्त दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद चांगले फिनिशर आहेत. असं असलं तरी मागच्या दोन सामन्यात मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी साजेशी कागमिरी केलेली नाही.
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.