मुंबई : आयपीएल 2023 चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 7 गडी राखून जिंकला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित आणखी कठीण झालं आहे. बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने हे आव्हान 16.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं आहे.
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 60 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्शनेही आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. पण हर्षल पटेलच्या गोलंदाजीव चुकीचा फटका मारताना बाद झाला. मात्र सॉल्टने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याला रिली रोसोची चांगली साथ लाभली. त्यांनी षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली. त्यामुळे चेंडू जास्त आणि धावा कमी अशी स्थिती झाली.
फिल सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. अवघ्या 11 धावा आवश्यक असताना अक्षर पटेल आला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
Match 50. WICKET! 15.3: Phil Salt 87(45) b Karn Sharma, Delhi Capitals 171/3 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
Rilee Rossouw is in a hurry ?
He joins Phil Salt in the middle to hit the maximums ?@DelhiCapitals need just 23 runs now
Follow the match ▶️ https://t.co/8WjagffEQP #TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/UnB4eE7SLh
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
Harshal Patel with an immediate impact ?
Mahipal Lomror with the catch to dismiss Mitch Marsh for 26
Follow the match ▶️ https://t.co/8WjagffEQP #TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/APxpvX10eq
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
Phil Salt is on song tonight ?
He reaches his 5️⃣0️⃣ and also bring up the 1️⃣0️⃣0️⃣ for @DelhiCapitals ?#DC require 80 runs in 66 balls
Follow the match ▶️ https://t.co/8WjagffEQP #TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/o0YYWlAnPN
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
एकाच षटकात फिल सॉल्टने ठोकले सलग दोन षटकार आणि एक चौकार
दिल्ली कॅपिट्ल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि फिलीप सॉल्ट ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे.
बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ आणि विराट कोहलीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. मात्र मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. मिशेल मार्शने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं.
दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोर यांनी डाव सावरला. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला मुकेश कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला. त्याने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या.
मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला.
Match 50. WICKET! 15.6: Virat Kohli 55(46) ct Khaleel Ahmed b Mukesh Kumar, Royal Challengers Bangalore 137/3 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
विराट कोहलीने 42 चेंडूत ठोकलं अर्धशतक
At the 7️⃣0️⃣0️⃣0️⃣ summit ?️
First player in IPL history to reach the feat! ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #DCvRCB @imVkohli pic.twitter.com/UJ6Tvpm9Ww
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 6, 2023
फाफ डुप्लेसिस नंतर ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद
DC Admin after Marsh's consecutive wickets ? pic.twitter.com/hHCD4Dxf9J
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 6, 2023
Match 50. WICKET! 10.4: Glenn Maxwell 0(1) ct Phil Salt b Mitchell Marsh, Royal Challengers Bangalore 82/2 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
Powerplay partnership in our last game was very instrumental for the win, and we've done that again tonight ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #DCvRCB pic.twitter.com/8wFSpWVT0G
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 6, 2023
एका षटकात फाफने तीन चौकार ठोकले.
Match 50. 0.2: Khaleel Ahmed to Virat Kohli 4 runs, Royal Challengers Bangalore 4/0 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Match 50. Royal Challengers Bangalore won the toss and elected to bat. https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.