मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्याच मोसमातील दुसऱ्या सामन्यात शफाली वर्मा हीने आपल्या स्टाईलने बॅटिंग करत चाहत्यांची मनं जिकंली. मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सच्या शफालीने वादळी खेळी केली. शफालीच्या या वादळी खेळीने चाहत्यांना पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग याची आठवण झाली. तसेच शफालीने तिला लेडी सेहवाग का म्हणतात,हे तिने पुन्हा सिद्ध करुन दाखवलं. शफालीने मोसमातील पहिल्याच सामन्या शानदार सुरुवात करत 84 धावांची खेळी केली.
शफालीने अवघ्या 31 बॉलमध्ये 3 खणखणीत सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. शफालीने या खेळीदरम्यान विराट कोहली याच्याप्रमाणे बॉलरच्या डोक्यावरुन गगनचुंबी सिक्स मारला.
शफाली वर्माचा तडाखा
6️⃣4️⃣6️⃣ @TheShafaliVerma is dealing in boundaries here in Mumbai ??
Follow the match ▶️ https://t.co/593BI7xKRy#TATAWPL | #RCBvDC pic.twitter.com/vXl5rOEgSh
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2023
आरसीबीकडून आशा शोभना ही सामन्यातील नववी ओव्हर टाकायला आली. शफालीने या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्रीझमधून पुढे येत कडकडीत सिक्स ठोकला. त्यानंतर पुढील बॉलवर चौकार आणि ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकला. शफालीच्या फटेकबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शफालीने बंगळुरु विरुद्ध 84 धावांची झंझावाती खेळी केली. शफालीला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र थोडक्यासाठी ती संधी हुकली. शफालीने 45 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 186 च्या कमाल स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या.
दरम्यान दिल्लीने आरसीबीला 224 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून शफालीशिवाय कॅप्टन मेग लॅनिंगने 72 रन्स केल्या. तर मारिजाने कॅप हीने नाबाद 39 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 22* धावांचं योगदान दिलं.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मॅग लँनिंग (कर्णधार) शफाली वर्मा, मारिजाने कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), सोफी डिवाइन, दिशा कसट, एलिस पॅरी, रिचा घोष, हेदर नाइट, कनिका आहूजा, आशा शोभना, मेगन शूट, प्रीति बोस आणि रेणुका सिंह.