RCB vs LSG : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडणाची ठिगणी इथे पडली, असं तापत गेलं प्रकरण पाहा Video

| Updated on: May 02, 2023 | 1:07 AM

IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दिक चमकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

RCB vs LSG : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडणाची ठिगणी इथे पडली, असं तापत गेलं प्रकरण पाहा Video
RCB vs LSG : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात या कारणामुळे भांडण? Video पाहून तुम्हीच ठरवा
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मैदानाबाहेर खेळाडूंमध्ये तू तू मै मै पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात जबरदस्त वाद झाला. लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण या भांडणाचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण नेटकऱ्यांनी या भांडणांचं एक कारण समोर आणलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या स्पर्धेत दुसऱ्यांचा आमनेसामने आले होते. पहिल्या सामन्यात लखनऊने बंगळुरुवर 1 गडी राखून विजय मिळवला होता. शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या विजयानंतर गौतम गंभीरने चिन्नास्वामी स्टेडियममधील बंगळुरुच्या फॅन्सना पाहून तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्यास सांगितलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.

दुसऱ्यांदा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने आले तेव्हा विराट कोहलीने तशी अॅक्शन केली. दोन गडी झटपट बाद झाल्याने विराट कोहलीने आनंद व्यक्त केला. त्यानंतर विराटने फॅन्सकडे पाहून गप्प बसा असा इशारा केला. अशीच अॅक्शन गौतम गंभीरने आरसीबी विरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सने विरुद्धचा सामना 18 धावांनी जिंकला. या विजयासह बंगळुरुला गुणतालिकेत चांगला फायदा झाला आहे.पाचव्या स्थानावर बंगळुरुने 10 गुणांसह झेप घेतली आहे. आता गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.