RCB vs LSG : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं काय झालं? सुरेश रैनाने सर्वकाही सांगितलं

| Updated on: May 02, 2023 | 1:53 PM

आयपीएल 2023 स्पर्धेला विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या वादाचं गालबोट लागलं. या वादामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. आजी माजी खेळाडूंनी या वादाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

RCB vs LSG : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं काय झालं? सुरेश रैनाने सर्वकाही सांगितलं
Video : विराट कोहली आणि गौतम गंभीर भांडण्याची पोलखोल, अँकरला उत्तर देताना सुरेश रैना म्हणाला..
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : कोणताही खेळ असला की खेळाडूंची आक्रमकता मैदानात पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी खेळ भावना टिकवणं गरजेचं आहे. अनेक जय पराजयानंतर दोन्ही संघाचे चाहते एकमेकांवर तुटून पडतात. मात्र खेळाडूंनी तसं करणं म्हणजेच खेळ भावनेला धक्का पोहोचवणं आहे. आयपीएल 2023 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यानंतर असाच वाद पाहायला मिळाला. इतकंच काय तर हाणामारी होऊ नये यासाठी काही खेळाडू धडपड करताना दिसले. या वादाचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लखनऊ संघाकडून खेळणारा अमित मिश्रा आणि बंगळुरुचा कर्णधार फाफ वाद शांत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. वादानंतर विराट कोहली आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांच्यात चर्चा झाली. तेव्हा नेमकं काय झालं याबाबत सुरेश रैनानं सांगितलं.

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात चर्चा सुरु असताना समालोचन करणाऱ्या सुरेश रैनाला अँकरने विचारलं की दोन खेळाडू काय बोलत असतील. तेव्हा सुरेश रैनाने हसत हसत उत्तर दिलं की, “ती गोष्ट जी आम्ही आता सर्व सांगत होतो. विराट राहुलला सांगत असेल की, मी काहीच केलं नाही. मी तर असं करतच नाही. पण माझ्याकडून होतं. हा विराटचा जोश आहे. मला वाटतं त्यांना सामनाधिकारी बोलवतील. कारण हे स्पोर्टमध्ये नको व्हायला. आनंद घेतला पाहीजे. ”

आरसीबीने लखनऊचा घरच्या मैदानात विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला.आरसीबीने हा सामना 18 रन्सने जिंकला. आरसीबीचा हा आयपीएल 16 व्या सिजनमधील 5 विजय ठरला. आरसीबीने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. आरसीबीने लखनऊसमोर 127 धावांचं विजयी आव्हान ठेवलं होतं. पण लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 धावाच करता आल्या. या दोन्ही संघांचा हा नववा सामना होता.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.