RCB vs MI IPL 2023 Highlights | बंगळुरुचा ‘रॉयल विजय’, मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने मात

| Updated on: Apr 03, 2023 | 1:29 AM

Royal Challengers Bangalore team vs Mumbai Indians IPL 2023 Highlights in Marathi | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने मात करत या मोसमात विजयाने सुरुवाता केली आहे. विराट कोहली आणि कॅप्टन फॅफ डु प्लेसिस हे दोघे आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले.

RCB vs MI IPL 2023 Highlights |  बंगळुरुचा रॉयल विजय, मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने मात
Follow us on

बंगळुरु | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील आज (2 एप्रिल) डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं.  या डबल हेडरमधील दुसऱ्या हायव्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा करत आरसीबीला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. आरसीबीने हे आव्हान 2 विकेट्स गमावून 16.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह आरसीबीने या मोसमात विजयी सुरुवात केली.  या सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियम करण्यात आलं होतं.

बंगळुरुकडून विराट कोहली याने सर्वाधिक नाबाद 82 धावांची खेळी केली. कॅप्टन फॅफ डु प्लेसिस याने 73 रन्स केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून अर्शद खान आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 1 विकेट घेतली. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली यांच्या कामगिरीकडे होतं.  यात विराट कोहली यशस्वी ठरला. मात्र रोहितला आपली छाप सोडता आली नाही. दरम्यान या विजायसह विराट विरुद्ध रोहित या रायव्हलरीमध्ये विराटने बाजी मारली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 02 Apr 2023 11:09 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आरसीबीचा मुंबईवर 8 विकेट्स विजय

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 172 धावांचं आव्हान आरसीबीने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 16.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आरसीबीकडून विराट कोहली आणि फॅफ डु प्लेसिस ही सलामी जोडी या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी 149 धावांची सलामी भागीदारी केली आणि त्यासह विजय निश्चित केला.

    विराट याने नाबाद 82 धावांची खेळी केली. कॅप्टन फॅफ डु प्लेसिस याने 73 रन्स केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून अर्शद खान आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 1 विकेट घेतली.

  • 02 Apr 2023 10:59 PM (IST)

    बंगळुरुची 149 धावांची सलामी भागीदारी, फॅफ आऊट, आरसीबीला पहिला झटका

    आरसीबीच्या विराट कोहली आणि कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 172 धावांचं पाठलाग करताना 149 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान विराट आणि फॅफ या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली.  अर्शद खान याला ही सेट जोडी फोडण्यात यश आलं.  अर्शदने फॅफला 73 धावांवर आऊट केलं.


  • 02 Apr 2023 10:19 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आरसीबीची झोकात सुरुवात, फॅफ-विराटची सलामी अर्धशतकी भागीदारी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची शानदार सुरुवात झाली आहे. 172 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या फॅफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या सलामी जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत टीमला अपेक्षित सुरुवात मिळवून दिली आहे. तर मुंबई ही जोडी फोडण्याच्या प्रयत्नात आहे.  मात्र अजूनही पलटणला यश आलेलं नाही.

  • 02 Apr 2023 09:52 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात, कोहली-फॅफ मैदानात

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार फॅफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आहे.  मुंबईने आरसीबीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 02 Apr 2023 09:47 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आरसीबीला विजयासाठी 172 रन्सचं टार्गेट, टिळक वर्मा याची अफलातून खेळी

    मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये टिळक वर्मा याच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. मुंबईकडून टिळक वर्मा याने सर्वाधिक 46 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 खणखणीत चौकारांच्या मदतीने 84 धावांची नाबाद खेळी केली. टिळक व्यतिरिक्त नेहाल वाढेरा याने 21, अर्शद खान आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 15 धावा केल्या. इशान किशन 10 रन्स करुन आऊट झाला. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

    आरसीबीकडून कर्ण शर्माने 2 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराज, रेस टोपली, अक्ष दीप आणि हर्षल पटेल या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 02 Apr 2023 08:27 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | मुंबईला चौथा झटका, सूर्यकुमार यादव आऊट

    मुंबई इंडियन्सने चौथी विकेट गमावली आहे.  सूर्यकुमार यादव 15 धावा करुन आऊट झाला आहे.  रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पलटणला सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र सूर्या आऊट झाल्याने मुंबई अडचणीत सापडली आहे.

  • 02 Apr 2023 08:03 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | कॅप्टन रोहित शर्मा आऊट

    मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. पलटणने रोहित शर्माच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे.  रोहित शर्मा 1 धाव करुन माघारी परतला आहे.

  • 02 Apr 2023 07:52 PM (IST)

    IPL 2023, RCB vs MI | मुंबईला झटपट 2 झटके

    मुंबईने झटपट 2 विकेट्स गमावल्या आहेत. इशान किशन 10 आणि कॅमरुन ग्रीन 5 धावा करुन आऊट झाले आहेत.

  • 02 Apr 2023 07:32 PM (IST)

    IPL 2023, RCB vs MI | मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून सलामीला कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात आले आहेत.

  • 02 Apr 2023 07:19 PM (IST)

    IPL 2023, RCB vs MI | पलटणची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

    पलटणची प्लेइंग इलेव्हन

  • 02 Apr 2023 07:16 PM (IST)

    IPL 2023, RCB vs MI | आरसीबीची प्लेइंग इलेव्हन

    आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.

    अशी आहे आरसीबी टीम

  • 02 Apr 2023 07:05 PM (IST)

    IPL 2023, RCB vs MI | आरसीबीने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकला आहे. कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधी पलटण बॅटिंग करुन आरसीबीला टार्गेट देणार आहे.

    मुंबईची बॅटिंग, आरसीबीने टॉस जिंकला

  • 02 Apr 2023 06:53 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?

    एम चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजासाठी फार फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना काडीची मदत मिळत नाही. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 170 धावा होतात. तसेच नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे योग्य ठरतो.

  • 02 Apr 2023 06:43 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने?

    आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात एकूण 30 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने एकूण 17 वेळा आरसीबीवर विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 13 मॅचमध्ये ‘पलटण’वर मात केली आहे.

  • 02 Apr 2023 06:31 PM (IST)

    RCB vs MI IPL 2023 Live Score | आरसीबी विरुद्ध एमआय आमनेसामने

    आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 5 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.