बंगळुरु | मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्याने या मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा विरुद्ध कर्णधार फॅफ डु प्लेसिस यांच्यात थेट लढत असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मुंबई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर आरसीबीला गेल्या 15 मोसमात एकदाही कारनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या सामन्यात आरसीबीसमोर मुंबईचं कडवट आव्हान असणार आहे. या निमित्ताने आपण संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रेडिक्शन जाणून घेऊयात.
आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात एकूण 30 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने एकूण 17 वेळा आरसीबीवर विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 13 मॅचमध्ये ‘पलटण’वर मात केली आहे.
एम चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजासाठी फार फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना काडीची मदत मिळत नाही. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 170 धावा होतात. तसेच नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे योग्य ठरतो.
क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलवरही सामना फिरतो. त्यामुळे मॅच कोण जिंकणार हे थेट सांगता येत नाही. मात्र मुंबई विरुद्धची गेल्या 5 सामन्यातील कामगिरी पाहता बंगळुरुची जिंकण्याची शक्यता अधिक आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संभाव्य प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कॅप्टन), फिन एलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करन शर्मा, रीस टॉप्ले आणि मोहम्मद सिराज.
मुबंई इंडियंस की संभाव्य प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमरून ग्रीन, टीम डेविड, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अरशद खान आणि जेसन बेहनडॉर्फ.