RCB vs RR : विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नोंदवला मोठा विक्रम

| Updated on: May 22, 2024 | 8:23 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत एलिमिनेटर फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने सावध सुरुवात करून दिली. विराट कोहलीने 29 धावा केल्या आणि एक विक्रम आपल्या नावे केला.

RCB vs RR : विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नोंदवला मोठा विक्रम
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहलीची हवी तशी फलंदाजी झाली नाही. त्याने 24 चेंडूत 33 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला. ब्रॉण्ड्री लाईनवर डोनोवन फेरेराने त्याचा झेल घेतला. आयपीएलमध्ये विराट कोहलीची सातत्यपूर्ण खेळी सुरु आहे.तत्पूर्वी विराट कोहलीने एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली होती. विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 29 धावा करताच एक विक्रम रचला आहे.आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही फलंदाजाला इतकी मोठी कामगिरी आतापर्यंत करता आलेली नाही. विराट कोहलीने आयपीएल इतिहासात 8 शतकं झळकावली आहेत. तसेच 50 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 113 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात 738 धावा केल्या आहेत. त्याने 5 अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. आता या स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीचा सामन्यात त्याच्या जवळपास कोण जाईल अशी शक्यता कमी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ क्वॉलिफायर 2 फेरीत पोहोचला तर या धावांमध्ये आणखी भर पडेल. कारण विराट कोहली आणि इतर फलंदाजांमध्ये आता 200 धावांचा फरक आहे. आणि दोन सामन्यात भरून काढणं खूपच कठीण आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.