RCB vs RR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं राजस्थानला इतक्या धावांचं आव्हान

| Updated on: Apr 23, 2023 | 5:49 PM

RCb vs RR : विराट कोहली आणि शाहबाज अहमद आऊट झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या आरसीबीला फाप डू प्लेसिस, मॅक्सवेल यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर संघाला एक सन्मानजनक धावसंख्या पूर्ण करता आली.

RCB vs RR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं राजस्थानला इतक्या धावांचं आव्हान
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील 32 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 षटकात 189 धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस 62 धावा आणि ग्लेन मॅक्सवेल 77 धावा यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने धावांचा 189  डोंगर उभारला आहे. राजस्थानला जिंकण्यासाठी 190 धावांची गरज आहे.

आरसीबीची बॅटींग 

आरसीबी संघाची सुरूवात एकदम  खराब झाली होती. विराट कोहली आणि शाहबाज अहमद याला  ट्रेंट बोल्ट या दोघांना बाद करत मोठे धक्के दिले होते. मात्र त्यानंतर फाफ आणि मॅक्सवेल यांनी 127 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आरसीबीच्या 12 धावांवर दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर दोघांनी शतकी भागीदारी केली. 139ला फाफ धावबाद झाला होता त्यानंतर मॅक्सवेलही बाद झाला.  दिनेश कार्तिक 16 धावा , वानिंदू हसरंगा 6 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख