आयपीएल 2024 स्पर्धेत एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे संघ भिडत आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास इथेच थांबणार आहे. तर विजेता संघ 24 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी अंतिम फेरीसाठी लढणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारत आणि पुढचं तिकीट कापतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सलग सहा सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. तर राजस्थान रॉयल्सला सलग चार पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. तसेच साखळी फेरीतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरीकडे, या सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर क्वॉलिफायर 2 चं तिकीट हे राजस्थान रॉयल्सला मिळेल. कारण गुणतालिकेत राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.