बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोनदा निवृत्ती, आता तिसऱ्यांदा खेळण्यासाठी झाला सज्ज!

| Updated on: Sep 25, 2024 | 4:37 PM

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माचं एक विधान चर्चेत आलं होतं.निवृत्तीनंतर खेळाडू घुमजाव करतात आणि पुन्हा खेळतात, असं सांगितलं होतं. आता तसंच होताना दिसत आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्यांदा आपला निवृत्तीचा निर्णय बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

1 / 5
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा वनडे क्रिकेट खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंडच्या वनडे संघाची धुरा आता प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सामोरं जाणार आहे.

2 / 5
इंग्लंडच्या कसोटी संघाला यशस्वीरित्या मार्गदर्शन करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमची वनडे आणि टी20 संघाच्या प्रशिक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तो निवृत्तीनंतर तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.

3 / 5
बेन स्टोक्सने 2022 मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पुनरागमन केलं आणि स्पर्धा होताच पुन्हा एकदा निवृत्त झाला. आता त्याने पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

4 / 5
बेन स्टोक्स म्हणाला की, मला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच पदार्पण करेन. प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमने मला फोन केला तर माझी काहीच हरकत नसेल. त्याच्या कारकिर्दित मला पुन्हा एकदा इंग्लंडकडून वनडे क्रिकेट खेळायचं आहे.

5 / 5
बेन स्टोक्सला वनडे संघात घ्यायचं की नाही याचा सर्वस्वी निर्णय प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमच्या हाती आहे. दुसरीकडे, कसोटीत या दोघांचं बाँडिंग पाहायला मिळालं आहे. त्यामुले मॅक्युलम त्याला पुन्हा संधी देईल यात शंका नाही. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत बेन स्टोक्स मैदानात दिसला तर आश्चर्य वाटायला नको.