टीम इंडियाची विकेटकीपर फलंदाज रिचा घोष हीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात इतिहास घडवला आहे. रिचा घोष हीने सामन्यातील पहिल्या डावात विस्फोटक बॅटिंग करत वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रिचाने डी वाय पाटील स्टेडियममध्ये चौफेर फटकेबाजी करत विंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. रिचाने यासह अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रिचाने यासह विश्व विक्रमाची बरोबरी केली. रिचा टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारी संयुक्तरित्या तिसरी महिला फलंदाज ठरली आहे.
रिचाने 18 बॉलमध्ये 283.33 च्या स्ट्राईक रेटने 5 गगनचुंबी सिक्स आणि 3 कडक चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. रिचा यासह टीम इंडियाकडून वेगवान अर्धशतक करणारी पहिली तर एकूण संयुक्तरित्या तिसरी फलंदाज ठरली. रिचाने सोफी डिव्हाईन आणि फोबी लिचफिल्ड या दोघींच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सोफी डिव्हाईन आणि फोबी लिचफिल्ड या दोघींनीही 18 बॉलमध्ये फिफ्टी केली होती.
न्यूझीलंडच्या सोफी डीव्हाईन हीने सर्वातआधी वेगवान अर्धशतक करण्याचा कारनामा केला. सोफीने 11 जुलै 2015 रोजी टीम इंडिया विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्ड हीने 8 वर्षांनंतर विंडीजविरुद्ध 2 ऑक्टोबर 2023 रोजी हा कारमाना केला होता. त्यानंतर आता रिचाने 14 महिन्यांनंतर ही कामगिरी करुन दाखवली आहे. रिचाने या सामन्यात 21 बॉलमध्ये एकूण 54 धावांची खेळी केली.
रिचा घोषकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
🚨 𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗 𝗔𝗟𝗘𝗥𝗧 🚨
5⃣0⃣ in just 1⃣8⃣ balls! 💪 💪
Richa Ghosh creates history! 🔝
She now has the joint-fastest T20I fifty (in women’s cricket) 👏 👏
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFirstbank pic.twitter.com/YoxIb3NM2E
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनाबी, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर आणि करिश्मा रामहारक.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.