मुंबई : आयपीएलच्या थरारानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना येत्या 7जूनला होणार आहे. फायनलसाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता शार्दुल ठाकूरचा वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा एक चांगला पर्याय टीम इंडियासाठी असणार आहे. मात्र टीम इंडियामध्ये या खेळाडूला न घेणं म्हणजे मोठी चूक ठरणार असल्याचं कांगारूंचा माजी कर्णधार पंटर म्हणजेच रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे.
इंग्लंडमधील परिस्थिती लक्षात घेता हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. फक्त या एका सामन्यासाठी त्याची संघात निवड व्हायला हवी होती. कारण हार्दिक बॉलिंग आणि बॅटींगनेही आपलं योगदान देऊ शकतो, असं रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे.
2018 मध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, तेव्हापासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. फिटनेस लक्षात घेऊन हार्दिकने आता पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिकी पाँटिंगच्या मते, हार्दिक पांड्याला WTC फायनलसाठी भारतीय संघात घ्यायला हवं होतं. आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये हार्दिकने 346 धावा करत बॉलसह 3 विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी 2021 ला टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली फायनलमध्ये गेली होती. फायनल सामना न्यूझीलंडशी झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव.
स्टँडबाय खेळाडू – सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार.