आयपीएल 2025 आधी मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंग याला लॉटरी लागली आहे. दिल्ली कॅपिटल्सने कोचपदावरून हटवल्यानंतर पॉन्टिंगला पंजाब किंग्ज संघाने हेड कोचपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. रिकी पाँटिंग 2014 ते 2016 या काळात मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक होते. मुंबईने 2015 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पाँटिंगला आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2018 पासून दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडले गेले होते. मात्र गेल्या सात वर्षांमध्ये दिल्लीला ट्रॉफी जिंकता आली नाही. रिकी पॉन्टिंगने पंजाब किंग्ज फ्रँचायझीसोबत 4 वर्षांचा करार केला आहे, जो 2028 मध्ये संपेल.
𝐏𝐔𝐍TER is 𝐏𝐔𝐍JAB! 🦁♥️
🚨 Official Statement 🚨
Ricky Ponting joins Punjab Kings as the new Head Coach! #RickyPonting #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/DS9iAHDAu7— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 18, 2024
पंजाब किंग्स संघाला आतापर्यंक एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलेली नाही. गेल्या सीझनमध्येही १४ सामन्यांमध्य फक्त पाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला होता. पॉईंटटेबलमध्येही खालून दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आतापर्यंत आयपीएलमध्ये प्ले-ऑफच्या जवळ आल्यावर टॉप 4 मधून बाहेर पडण्याचा त्यांचा इतिहास आहे. आयपीएलचे 17 सीझन झाले अद्याप पंजाबला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आता पंटरच्या येण्याने टीमला काही नवीन संजीवणी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रिकी पाँटिंगने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळाडू म्हणून सुरूवात केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये पंटर गेला आणि त्याच्याकडे कर्णधारपदही देण्यात आले होते. त्याने रोहित शर्माकडे कॅप्टन्सी सोपवली. मुंबईचा कोच म्हणून त्याने काम पाहिले. 2018 ते 2023 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच राहिला होता. यामध्ये दिल्लीच्या टीमने लग तीन प्लेऑफ आणि एक फायनल खेळली.
पंजाब संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये हर्षल पटेल (2024 पर्पल कॅप विजेता), अनकॅप्ड भारतीय प्रतिभावान शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा आणि अर्शदीप सिंग, जितेश शर्मा आणि राहुल चहर यासारख्या काही प्रमुख नावांचा समावेश आहे. पंजाब संघातही काही उत्कृष्ट विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये इंग्लंडचा सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांचाही समावेश आहे.