मुंबई : भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला टी20 सामना गमावला. या पराभवामुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. आता मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया धडपड करावी लागणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्यातील पराभवाची कारणं शोधून आता टीम इंडियाला पुढे जावं लागणार आहे. या सामन्यात सलामीला आलेले शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल खातं न खोलता तंबूत परतले. त्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी मोर्चा सांभाळला. संघाची धावसंख्या 180 वर पोहोचवण्यास मदत केली. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला डाव 19.3 षटकांवरच थांबवण्यात आला. तर डकवर्थ लुईस नियमानुसार 152 धावांचं टार्गेट दक्षिण अफ्रिकेला देण्यात आलं. हे टार्गेट दक्षिण अफ्रिकेने 13.5 षटकात पाच गडी गमवून पूर्ण केलं. भारताने सामना गमवाला तरी रिंकू सिंहची खेळी लक्षवेधी ठरली. रिंकूने 39 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. या खेळीमागचं रहस्य त्याने सामन्यानंतर सांगितलं.
“मी जेव्हा बॅटिंग करायला गेलो तेव्हा तीन गडी बाद झाले होते. तेव्हा परिस्थिती कठीण होती. सूर्यासोबत खेळत असताना तो फक्त इतकंच म्हणाला जसा खेळत आला आहेस तसाच खेळ. आपला गेम खेळ. मी थोडा वेळ घेतला. कारण खेळपट्टी समजून घेण्यात थोडा वेळ लागला. सेट झाल्यानंतर मोठे फटके मारले. सुरुवातीला हवी तशी बॅटिंग होत नव्हती, पण सूर्या म्हणाला शांत डोकं ठेव आणि आपला गेम खेळ. त्यानंतर सर्वकाही ठिक झालं. मी षटकार मारला तेव्हा मला माहितीच नव्हतं की काच तुटली. तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. त्यासाठी सॉरी..”
Maiden international FIFTY 👌
Chat with captain @surya_14kumar 💬
… and that glass-breaking SIX 😉@rinkusingh235 sums up his thoughts post the 2⃣nd #SAvIND T20I 🎥🔽 #TeamIndia pic.twitter.com/Ee8GY7eObW— BCCI (@BCCI) December 13, 2023
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा सामना रविवारी 14 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यातील जय पराजय मालिकेचा निकाल सांगणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया कसा कमबॅक करते याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल आहे का? याकडेही लक्ष लागून आहे. ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळतं का? याबाबतही चर्चा रंगली आहे.