Video : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ऋषभ पंतची जबरदस्त विकेटकीपिंग, त्याने घेतलेला झेल पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

| Updated on: Sep 08, 2024 | 6:15 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया बी संघाने शुबमन गिलच्या संघाला पराभूत केलं आहे. या सामन्यात ऋषभ पंतने जबरदस्त विकेटकीपिंगचं दर्शन घडवलं. त्याने आवेश खानचा जबरदस्त झेल पकडला. त्याचा या झेलची आता चर्चा रंगली आहे.

Video : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ऋषभ पंतची जबरदस्त विकेटकीपिंग, त्याने घेतलेला झेल पाहून तुम्हीही तसंच म्हणाल
Image Credit source: video grab
Follow us on

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच संघाची निवड केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी पाहिली जाणार असं आधीच स्पष्ट झालं होतं. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल असेल दिग्गज खेळाडू या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात खेळले. या सामन्यात ऋषभ पंतने आपल्या खेळी आणि विकेटकीपिंगने लक्ष वेधून घेतलं. पहिल्या डावात फेल ठरलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या डावात जबरदस्त कमबॅक केलं. दुसऱ्या डावात 47 चेंडूत 61 धावा केल्या. तसेच दिवसभर आरामात विकेटकीपिंग करू शकतो हे दाखवून दिलं. इतकंच काय तर आवेश खानचा झेल घेण्यासाठी मारलेली उडी पाहून तु्म्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. त्याच्या या झेलचा व्हिडीओ बीसीसीआयने एक्सवर पोस्ट केला आहे.

इंडिया ए च्या दुसऱ्या डावातील 51 व्या षटकात इंडिया बी संघाकडून नवदीप सैनी षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आवेश खान स्ट्राईकवर होता. नवदीप सैनीने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला आणि उसळी घेणाऱ्या चेंडूपासून आवेश खान बचावात्मक खेळायला गेला. यावेळी त्याच्या बॅटला चेंडू हलकासा घासून गेला विकेट मागे गेला. ऋषभ पंतने क्षणाचाही विलंब न करता उलट्या बाजूला उडी घेतली आणि जबरदस्त झेल पकडला. आवेश खान फक्त 3 धावा करून तंबूत परतला.

येत्या काही तासात टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. या संघात ऋषभ पंतच्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल. आता ऋषभ पंतला संधी मिळते की केएल राहुलला हे संघ घोषित झाल्यावरच कळेल. पण ऋषभ पंतने आपल्या खेळीने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऋषभ पंत 2022 मध्ये झालेल्या अपघातानंतर जवळपात 15 महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर त्याने आयपीएलमधून कमबॅक केलं. आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहून त्याची निवड टी20 वर्ल्डकप संघात केली. यावेळी तो सर्व सामन्यात खेळला. तसेच आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं. आता कसोटीत कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.