Video : मला काय माहिती याला हिंदी येते ते..! ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये तू तू मैं मैं

| Updated on: Oct 24, 2024 | 8:44 PM

भारत न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस वॉशिंग्टन सुंदरने गाजवला. तीन वर्षानंतर त्याने कसोटी संघात जबरदस्त पुनरागमन केलं आहे. असं असताना या सामन्यातील ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : मला काय माहिती याला हिंदी येते ते..! ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये तू तू मैं मैं
Image Credit source: video grab
Follow us on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने 1 गडी बाद 16 धावा केल्या आहेत. शुबमन गिल नाबाद 10, तर यशस्वी जयस्वाल नाबाद 6 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या आहेत. त्यामुळे अजूनही भारत 243 धावांनी पिछाडीवर आहे.असं असताना पहिल्या दिवशी विकेटकीपर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत या दोघांमध्ये खेळीमेळीत तू तू मैं मैं झाल्याचं दिसत आहे. विकेटकीपर ऋषभ पंतने स्पिनर वॉशिंग्टन सुंदर फुलर चेंडू टाकायला सांगितला होता. पण एजाज पटेलने हा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने मारला. झालं असं की, एजाज पटेल फलंदाजी करत होता. तेव्हा काही टीप्स म्हणून ऋषभ पंतने वॉशिंग्टन सुंदरला सल्ला दिला. त्याचं हे संभाषण स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून व्हायरल झालं आहे.

स्टम्प माईकमध्ये झालेल्या रेकॉर्डिंगनुसार ऋषभ पंत म्हणाला की, ‘वॉशी पुढे टाकू शकतो, तू याला थोडा फुलर चेंडू टाकू शकतो. थोडा बाहेर टाकू शकतो.’ वॉशिंग्टन सुंदरने ऋषभ पंतचं म्हणणं ऐकलं आणि तसंच केलं. पण या चेंडूवर एजाज पटेलने जोरदार प्रहार केला आणि बाउंड्री पार चेंडू पाठवला. त्यानंतर ऋषभ पंतने लगेच आपला रंग बदलला आणि म्हणाला, ‘मित्रा, मला काही माहिती याला हिंदी येते ते..’ दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने एकूण 7 विकेट घेतल्या यात एजाज पटेलची विकेटही होती. एजाज पटेल 9 चेंडूत 4 धावा करून वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ़

वॉशिंग्टन सुंदरने भारतीय कसोटी संघात तीन वर्षांनी पदार्पण केलं आहे. वॉशिंग्टन सुंदरने शेवटचा कसोटी सामना भारतासाठी मार्च 2021 मध्ये खेळला होता. पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना आराम देण्यात आला आहे. तसेच संघात वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीपला संधी दिली आहे.