Rishabh Pant Health Update : ऋषभ पंत मुंबईत दाखल, ‘या’ रुग्णालयात होणार उपचार

| Updated on: Jan 04, 2023 | 8:17 PM

ऋषभ पंतला (Rishabh Pant Health Update) पुढील उपचारांसाठी मुंबईत एअर लिफ्टने शिफ्ट करण्यात आलं आहे.

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंत मुंबईत दाखल, या रुग्णालयात होणार उपचार
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेने मुंबईत शिफ्ट करण्यात आलं आहे. पंतला अपघातामुळे क्रिकेटपासून किमान 6 महिने दूर रहावं लागणार आहे. मुंबईत पंतच्या गुडघा, टाच आणि लिंगामेंटवर उपचार करण्यात येणार आहे. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी या बड्या रुग्णालयात पंतवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समजत आहे. पंतचा शुक्रवारी 30 डिसेंबरला अपघात झाला होता. (rishabh pant health update cricketer has shifted To ambani hospital mumbai for ligament surgery tratment)

पंतवर होणार ही शस्त्रक्रिया

ऋषभ पंतवर लिंगामेट सर्जरी (Ligament Surgery) होणार आहे. “अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर पंतला मुंबईत शिफ्ट केलं गेलं. तसेच पंतवर प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ परदीवाला हे उपचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

“पंतला झालेल्या लिगामेंटच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होईल. पंतला त्यानंतर पुढील उपचार होतील. तसेच शस्त्रक्रियेनंतर पंतवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथकही लक्ष ठेवेल”, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली.

पंतच्या गाडीला भीषण अपघात

पंत दिल्लीवरुन उत्तराखंडमधील राहत्या घरी जात होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग 58 वर पंतचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी आधीच वेगात होती. ताबा सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. अपघातानंतर पंत झटकन गाडीची काच तोडून बाहेर पडला. त्यानंतर गाडीने पेट घेतला. पंत वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. दरम्यान पंत लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी देशभरातून पार्थना केली जात आहे.