प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत ऋषभ पंत हे काय बोलून गेला, क्रीडाविश्वात रंगली उलटसूलट चर्चा

| Updated on: Sep 06, 2024 | 1:53 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आणि गौतम गंभीरच्या हाती धुरा आली. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरने कामाला सुरुवात केली. टी20 मालिकेत यश, तर वनडे मालिकेत अपयश आलं. टीम इंडिया आता कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. असं असताना ऋषभ पंतच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत ऋषभ पंत हे काय बोलून गेला, क्रीडाविश्वात रंगली उलटसूलट चर्चा
Follow us on

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचं नवं पर्व सुरु झालं आहे. साडे तीन वर्षांसाठी गौतम गंभीर टीम इंडियासोबत असणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, टी20 वर्ल्डकप 2026 आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली नुकताच श्रीलंका दौरा पार पडला. टी20 मालिकेत यश पदरी पडलं. पण दिग्गज खेळाडू संघात असूनही वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे गौतम गंभीर आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची तुलना होण्यास सुरुवात झाली आहे. कारण राहुल द्रविड एकदम शांत स्वभावाचा आहे. तर या उलट गंभीरचा स्वभाव आक्रमक असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. खेळाडू गंभीरसोबत जुळवून घेतील का? असा प्रश्न आधीपासूनच क्रीडाप्रेमींना पडला आहे. आता भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात उलटसूलट चर्चांना उधाण आलं आहे.

ऋषभ पंतने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्यातील फरक सांगितला. “मला वाटते की, राहुल भाई एक व्यक्ती आणि प्रशिक्षक म्हणून खूप संतुलित होती. आमच्यासाठी क्रिकेट टीम म्हणून चांगले वाईट क्षण आले. क्रिकेटच्या प्रवासात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही क्षण अनुभवता येतात. एखादी व्यक्ती सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करते की नकारात्मक गोष्टींकडे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.” असं ऋषभ पंत म्हणाला. दुसरीकडे गौतम गंभीरबाबत त्याने आपलं मत व्यक्त केलं. ‘गौतम भाई खूप आक्रमक आहे. संघाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. तो त्या बाबतीत एकतर्फी असतो. पण तुम्हाला योग्य संतुलन आणि सुधारणा करण्याची गरज असते. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वोत्तम भाग आहे.’, असंही ऋषभ पंत पुढे म्हणाला.

ऋषभ पंतच्या या वक्तव्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. ऋषभ पंतने गंभीर आक्रमक असल्याचं सांगितल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. त्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्याने सावध भूमिका घेणं योग्य ठरेल. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यापूर्वी 12 सप्टेंबरला टीम इंडियाचं चेपॉक मैदानावर प्रशिक्षण सुरु होणार आहे.