मुंबईः भारतीय क्रिकेट संघासह आज जगभरातील क्रिकेट शौकिंनांना भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला होता. दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकून शुक्रवारी सकाळी मोठा अपघात झाला होता. नरसन सीमेवरील हम्मादपूर झालजवळ हा भीषण दुर्घटना घडली होती. यावेळी अपघात होताच काही वेळातच त्यांच्या महागड्या कारला आगही लागली होती.
या दुर्घटनेनंतर पंतला रुग्णालयात दाखल केले असून त्याचा अपघात होण्यापूर्वी एक दिवसाआधीचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या कारला गंभीर अपघात झाला. हा अपघात होण्यापूर्वीचा एक दिवसा आधीचा आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तो पक्ष्यांना खाऊ टाकत आहे. तर या व्हिडीओला पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माय सिली पॉइंट ऑफ द डे.’ त्यामुळेऋषभ पंतच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सच्या कमेंट येत आहेत. तो लवकर निरोगी आणि तंदुरुस्त व्हावा अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
अनेक जण आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी मिळाल्यानंतर अनेकांना आपल्यासारखंही इतरांनी सुखी आणि आनंदी राहावं असं वाटतं. त्यामुळे अनेक जण पक्षानाही खायला देणे, त्यांची काळजी घेणे ही कामंही करतात.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते असं सांगितले जाते. जेव्हा एकाद्या व्यक्ती पक्ष्यांना खाऊ घालते तेव्हा तो त्या मुक्या प्राण्यांसाठी एक प्रकारचे देवाचेच तो कार्य करतो असं मानलं जातं.
जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील पक्ष्यांना धान्य खायला घालता तेव्हा तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत असते. त्यामुळेच सुख, शांती आणि समृद्धी येते. याशिवाय घरामध्ये कबुतर खायला आल्यास तुम्हाला आर्थिक फायदाही होत असतो.
काही लोक स्वतःच्या घराच्या गच्चीवर कबुतरांसाठी अन्न ठेवतात. अशा परिस्थितीत नफ्याऐवजी तोटाही होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार राहू घराच्या छताशी संबंधित आहे आणि कबुतराला खायला घालणे हे बुध ग्रहासाठी एक उपाय आहे.
कुंडलीसोबतच जर बुध आणि राहूचा संयोग असेल तर व्यक्तीची मानसिक अवस्था चांगली नसते असंही सांगितले जाते. कबूतर छतावर बसतात तेव्हा ते पक्षी छतालाही घाण करत असतात. त्यामुळे छप्पर हेही दूषित होते.