Video : ऋषभ पंत याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, अपघातानंतर पाण्यात…. व्हिडीओ एकदा पाहाच

| Updated on: Mar 15, 2023 | 7:18 PM

ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी पंतने सोशल मीडियावर याआधी काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये क्रॅचच्या मदतीने तो चालताना दिसलेला. अशातच पंतने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video : ऋषभ पंत याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, अपघातानंतर पाण्यात.... व्हिडीओ एकदा पाहाच
Follow us on

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू  ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर दुखापत झाली होती. आता पंत लवकर रिकव्हर होत असलेला दिसून येत आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ऋषभ क्रॅचच्या मदतीने चालताना दिसला होता. अशातच पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतने त्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नेमकं काय व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत हा पाण्यामध्ये चालताना दिसत आहे. पाण्यात चालताना पंतने एका हातामध्ये क्रॅच आहे. ज्या काही लहान-मोठ्या गोष्टी झाल्या आहेत त्यासाठी मी कृतज्ञ असल्याचं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्याच्या क्रीडा चाहत्यांनी लवकरात लवकर कंमबॅक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स आले असून त्यामध्ये सुरेश रैनाचाही समावेश आहे.

 

हा व्हिडीओ पाहून त्याला क्रीडा चाहत्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंत इतका मोठा अपघात होऊनसुद्धा काही सुधारणार नाही, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. असं काही करताना चुकून दुखापत वाढली तर रिक्व्हर व्हायला आणखी दिवसांचा कालावधी लागू शकतो. असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

अपघातामध्ये झालेल्या दुखापतीमुळे पंत सध्या मैदानापासून दूर आहे. अद्याप लेगच तो पुनरागमन करू शकणार नाही. आताच एका मुलाखतीमध्ये बोलताना, जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन खूप बदलला आहे. माझ्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक आणि नकारात्म झाली आहे हे सांगणं कठीण आहे. अपघातानंतर मला रोज दात घासण्यात आणि उन्हामध्ये बसण्यात आनंद मिळत असल्याचं त्याने सांगितलं.

मी छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देतो आणि त्याचा आनंद देतो. आपण कष्ट करून काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामध्ये अडकून जातो. याचा परिणाम असा झाला आहे की यामुळे आपण छोट्या-छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचं विसरलो आहोत, असं ऋषभ पंतने म्हटलं आहे.