राजस्थानचा युवा आणि विस्फोटक फलंदाज रियान पराग याला आयपीएलच्या 17 व्या मोसमात चांगलाच सूर गवसलेला आहे. रियानने हाच सूर कायम ठेवत गुजरात टायटन्स विरुद्ध सवाई मानसिंह स्टेडियम जयपूर येथे खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे. रियान पराग याने मोहित शर्मा या अनुभवी गोलंदाजाला कडक सिक्स खेचत अर्धशतक पूर्ण केलं. रियानने या अर्धशतकासह आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. रियानने 34 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 155.88 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. रियानच्या आयपीएलच्या कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठरलं. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे संजूने या 5 पैकी 3 अर्धशतकं याच हंगामात ठोकली आहेत. या खेळीमुळे रियानचं नाव आता टी 20 वर्ल्ड कप निवडीच्या शर्यतीत आलं आहे.
दरम्यान रियान परागचा आणि राजस्थान रॉयल्सचा या 17 व्या मोसमातील पाचवा सामना आहे. रियानने याआधीच्या 4 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक ठोकली आहेत. रियानने पहिल्या 4 सामन्यांमध्ये अनुक्रमे 43, 84*, 54* आणि 4 अशा धावा केल्या होत्या. रियानने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पहिल्याच सामन्यात 43 धावा ठोकल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 45 बॉलमध्ये 84 धावांची झंझावाती खेळी केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध 39 बॉलमध्ये 54 धावा ठोकल्या. मात्र रियान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अपयशी ठरला. रियानने त्या सामन्यात 4 चेंडूत 4 धावा केल्या.
रियान परागचा झंझावात
Third fifty of the season for Riyan Parag! 🔥🔥
The third-wicket partnership has put @rajasthanroyals back on track 💪
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/2iKjjWFs4J
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.