धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 3 दिवसांनी दुसरा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अफगाणिस्तानने विश्व विजेता इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर आता नेदरलँड्सने चोकर्स असलेल्या दक्षिण आफ्रिका टीमला उपट देत 38 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 43 षटकांमध्ये 246 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 42.5 ओव्हरमध्ये 207 धावांवर आटोपला. नेदरलँड्सचा वनडे वर्ल्ड कपमधील 16 वर्षानंतरचा पहिला विजय ठरला. नेदरलँड्सच्या या विजयात 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र 38 वर्षांच्या अनुभवी रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने निर्णायक आणि ऑलराउंड कामगिरी केली.
रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने बॉलिंग आणि त्याआधी बॅटिंगने डबल धमाका केला. रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने आधी 19 बॉलमध्ये 29 धावा केल्या. तर त्यानंतर 9 ओव्हर बॉलिंग टाकून 2 विकेट्स घेतल्या.
रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याच्यासोबत टीमसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. एडवर्ड्स आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे या दोघांनी टॉप गिअर टाकत फटकेबाजी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी फक्त 40 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. व्हॅन डर मर्वे 19 बॉलमध्ये 29 धावा केल्या. व्हॅन डर मर्वे याने या खेळीत 3 चौकार आणि 1 सिक्स ठोकला.
Roelof Van Der Merwe, South African born, 38-year-old:
– 29(19) with bat.
– 2 wickets for 34 runs with ball.What a performance, the fighter, he gives 110% in the field for the team. pic.twitter.com/dw98klFZGh
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.