द कपिल शर्मा शोने गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमात दिग्गजांची हजेरी असते. तसेच हास्याचे फवारे उडवत त्यांच्या मनातील ओलावा समोर आणलं जातं. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हसता हसता दिग्गजांबाबत बरंच काही उलगडलं जातं. द कपिल शर्मा शोचं नवं पर्व सुरु झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भागात कपूर फॅमिलीने हजेरी लावली होती. आता आयपीएल स्पर्धा सुरु असताना दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाची धुरा हाती असलेला श्रेयस या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. तसेच कपिल शर्माच्या रुपात नवज्योतसिंह सिद्धूनेही हजेरी लावली आणि कार्यक्रमाला रंगत चढली. द ग्रेट इंडियन कपिल शोचा नवा प्रोमो नेटफ्लिक्सवर शेअर केला आहे.
प्रोमोमध्ये कपिल शर्मा हा रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचं स्वागत करताना दिसत आहे. तसेच कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून कपिल शर्माने नवज्योतसिंह सिद्धूचं रुप धारण केलं. तसेच जज असलेल्या अर्चना पूरन सिंह हिची खूर्ची खेचण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या कार्यक्रमात चियर लीडर म्हणून डान्स करताना दिसले. तसेच दोघांनी कपिल शर्माच्या तिखट गोड प्रश्नांना उत्तरं दिली.
कपिल शर्माने रोहित शर्माला प्रश्न विचारला की, कधी लोकांकडून विचित्र सल्ला मिळाला आहे का? त्यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “म्हणूनच आम्ही एअरपोर्टवरून कानात हेडफोन घालून निघतो. ते काय स्टाईल मारण्यासाठी नाही. ते सर्वकाही लोकांपासून वाचण्यासाठी असतं.” दुसरीकडे, सुनील ग्रोव्हरने रोहितला ओपनिंग बॅट्समन कसा बनवायचा याविषयी विचारले असता, त्याने “ओपनिंग बॅट्समन तो भूल जाओ” असे उत्तर दिले.या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका लिहिलं की, द ग्रेट इंडिया रोहित शर्मा शो. दुसऱ्याने लिहिलं की, हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहे.