टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. न्यूयॉर्कच्या नैसो काउंटीमधेय टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग सराव करत आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. भारताला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. समोर दुबळा संघ असला तरी हलक्यात घेणं महागात पडू शकतं. त्यासाठी 5 जूनच्या सामन्यात सर्वस्वी पणाला लावलं जाणार आहे. स्पर्धेची तयारी सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओत दोघं रस्त्यावर धावताना दिसत आहे. रोहित शर्मा चप्पल घालून, तकर राहुल द्रविड टीशर्ट आणि शॉर्ट्स घालून धावताना दिसले. पण नेमकं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते
टीम इंडिया नैसो काउंटीमध्ये असून या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसत असताना राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांना कुठेतरी जायचं होतं. रोहित शर्मा पाऊस थांबण्याची वाट पाहात होता. पण पावसाचा जोर काही थांबत होता. अखेर त्यांनी गाडी मागवली आणि पावसात भिजत गाडीकडे धाव घेतली. रोहित शर्माने यावेळी चप्पल घातली होती. तर राहुल द्रविडही भिजू नये म्हणून गाडीकडे वेगाने गेला आणि बसला.
Team India spotted in New York. Wait for Rohit Sharma’s sprint. 😂 pic.twitter.com/QlfPlSSLAW
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) May 29, 2024
नैसो काउंटीमध्या पाऊस पडत असल्याने साखळी फेरीवर त्याचा परिणाम होऊ इतकी अपेक्षा आता क्रीडाप्रेमी करत आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाने ड्रॉप इन पिचवर जोरदार सराव केला. ड्रॉप इन पिच कृत्रिम पिच असून सरावासाठी मैदानात ठेवली जाते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमद्ये या खेळपट्टीचा वापर केला जातो. ही खेळपट्टी खासकरून फलंदाजांना मदत करते. पण स्पर्धेतील खेळपट्टी कोणाला मदत करणार हे काही सांगता येत नाही. रोहित शर्माने यासाठी संघात फिरकीपटूंना घेतलं आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.