Duleep Trophy: रोहित-विराट दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार की नाहीत? काय ठरलं?

| Updated on: Aug 15, 2024 | 12:45 AM

Virat Kohli and Rohit Sharma Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयने 4 संघांची घोषणा केली आहे.

Duleep Trophy: रोहित-विराट दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार की नाहीत? काय ठरलं?
virat kohli and rohit sharma test cricket
Image Credit source: PTI
Follow us on

क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी संघ केव्हा जाहीर होणार? कुणाला संधी मिळणार? याबाबतची उत्सुकता लागून होती. बीसीसीआयने अखेर बुधवारी 14 ऑगस्ट रोजी दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी 4 संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत अनुभवी आणि युवा खेळाडूंमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे आजी माजी कर्णधार खेळणार की नाहीत? याकडे साऱ्यांचंच लक्ष होतं. मात्र हे दोघेही पहिल्या फेरीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता रोहित आणि विराट दुसऱ्या फेरीत सहभागी होतील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 5 ते 19 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया मायदेशात बांग्लादेश विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील ज्या खेळाडूंची बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होईल, त्यांना रिप्लेस केलं जाईल, अशी माहितीही बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 4 संघातील खेळाडू

टीम ए: शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा आणि शास्वत रावत.

टीम बी: अभिमन्यू इशवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेस टेस्ट आवश्यक) , वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, एन जगदीसन (विकेटकीपर), आर साई किशोर आणि मोहित अवस्थी.

टीम सी: ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बाब इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे (विकेटकीपर) आणि संदीप वारियर.

टीम डी: श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.