Video : रोहित शर्माने गर्दीला केलं शांत, इशाऱ्यातच सर्वकाही बोलून गेला

| Updated on: Apr 06, 2024 | 12:42 PM

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं काही खरं दिसत नाही. सुरुवातीचे तीन सामने गमवल्याने पुढील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवताना चांगलीच दमछाक होणार आहे. असं सर्व असताना भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कणा असलेला रोहित शर्मा वेगळ्यात भूमिकेत दिसला. विमानतळावरून गाडीत बसेपर्यंत रोहित शर्माने वडिलांची भूमिका चोख बजावली.

Video : रोहित शर्माने गर्दीला केलं शांत, इशाऱ्यातच सर्वकाही बोलून गेला
Video : रोहित शर्माने इशाऱ्यातच गर्दीला सर्वकाही सांगून टाकलं, गाडीत बसेपर्यंत अशी घेतली काळजी
Follow us on

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत आहेत. दोन्ही संघांचं स्पर्धेतील वाटचाल तशी पाहिली तर निराशाजनक आहे. दिल्ली कॅपिटल्सने चार पैकी तीन सामने गमावले आहेत. तर मुंबईच्या वाटेला तिन्ही सामन्यात पराभव आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित केला. बिझी शेड्युलमध्ये रोहित शर्माने वेळ काढला आणि जामनगरमध्ये पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत सुट्टीचा आनंद लुटला. यावेळी रोहित शर्माने वॉटर स्कूटर चालवण्याचा आनंदही लुटला. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. आता रोहित शर्माचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने एअरपोर्टवरून परतत असताना चाहत्यांची इशाऱ्यानेच बोलती बंद केली. कारण समायरा रोहित शर्माच्या खांद्यावर झोपली होती आणि तिची झोप मोड होऊ नये याची त्याने काळजी घेतली.

एअरपोर्टवरून रोहित शर्मा बाहेर निघत असताना जमावाने लक्ष वेधण्यासाठी आरडाओरड सुरु केला. त्यांच्या आवाजाने मुलगी समायरा उठेल याची जाणीव रोहित शर्माला लगेच झाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. इतकंच काय तर समायराची झोप गाडीत बसेपर्यंत मोडू दिली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा हे मात्र स्पष्ट नाही.

रोहित शर्माच्या खांद्यावर सध्या मुंबई इंडियन्सची धुरा नाही. पण संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून भूमिका बजावत आहे. ओपनिंगलाा येत पहिल्या सामन्यात चांगली कागमिरी केली होती. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आता दिल्ली विरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा आहे.

दुसरीकडे, आयपीएलमधील चौथ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. मुंबईला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील पुढची वाटचाल खूपच बिकट होईल. इतकंच काय तर जर तरच्या गणितात गुरफटून राहावं लागेल.