मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघाने पूर्ण तयारी केली असून आता फक्त वर्ल्ड कप ला सुरुवात होण्याची बाकी आहे. भारतीय संघासोबत इतर संघांनी जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघासोबत असणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये कर्णधार रोहित शर्मा कडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. रोहित शर्माकडे संघाच्या कर्णधार पदाची धुराई त्याच्याकडे आहे. इतकच नाही तर रोहित शर्माला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. यासाठी त्याला फक्त एक शतक मारण्याची गरज आहे. नेमका कोणता विक्रम आहे तो जाणून घ्या.
रोहित शर्मा कडे एक मोठी संधी असून त्यासाठी त्याला फक्त एक शतक करावं लागणार आहे. हे शतक केल्यावर हिटमॅन भारतासाठी सर्वाधिक शेतकऱ्यांना पहिला खेळाडू ठरणार आहे. आता पाहिलं रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर हे प्रमुख खेळाडू असून दोघांनीही वर्ल्ड कपमध्ये सहा शतके केली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहितने एक शतक केली की त्याची सात शतके होणार आहेत.
वर्ल्डकपमध्ये शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा सहा शतकांसह पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानी सौरव गांगुली 4, शिखर धवन 3 आणि राहुल द्रविड याची दोन शतके आहेत. रोहित शर्माने वर्ल्ड कप मध्ये 17 सामन्यांमध्ये सहा शतकं ठोकत 978 धावा केल्या आहेत. तर वनडे वर्ल्ड कप मधील रोहितची सर्वोत्तम खेळी 140 धावा आहे. या 17 सामन्यांमध्ये रोहितने एकूण 100 चौकार तर 23 षटकार मारले आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकरने वन डे वर्ल्ड कप मध्ये 45 सामन्यांच्या 44 डावांमध्ये 2278 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 152 धावा इतकी आहे.
दरम्यान, भारताचं मिशन वर्ल्ड कप 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईमधील चेपॉक मैदानावर होणार आहे. आताच पार पडलेल्या मालिकेमध्ये भारतीय संघाने कांगारूंचा 2-1 ने पराभव केला आहे.