टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. धाकधूक वाढवणाऱ्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. 14व्या षटकानंतर हा सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. मात्र तिथून हा सामना भारतीय संघाने खेचून आणला. जवळपास 11 वर्षे टीम इंडिया आयसीसी जेतेपदासाठी कासावीस झाली होती. गेल्या काही वर्षात संधी मिळाली सुद्धा..पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. पण टीम इंडियाची मेहनत मात्र सुरुच होती. त्याला आता कुठे यश मिळालं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना न गमवता टीम इंडियाने विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर सहा महिन्यातच टीम इंडियाने करून दाखवलं आहे. इतकंच काय तर बीसीसीआयने रोहित शर्मावर विश्वास दाखवला तो त्याने सार्थकी लावला. विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला.
जेतेपदाची ट्रॉफी घेताना रोहित शर्माच्या अंगात लियोनल मेस्सीचं भूत संचारलं होतं, असं म्हंटलं वावगं ठरणार आहे. मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हणूनच त्याने ट्रॉफी घेण्यासाठी मेस्सीच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली आणि ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माची एन्ट्री पाहून खेळाडूंनाही आनंद झाला. त्यांनी प्रत्यक्ष क्षणांचा आनंद लुटला. तसेच ट्रॉफी उंचावून आनंदोत्सव साजरा केला.
THE TROPHY CELEBRATION OF ROHIT ARMY. 🥺 🇮🇳 pic.twitter.com/BQRGC46OHc
— Johns. (@CricCrazyJohns) June 29, 2024
Rohit Sharma with the Iconic walk like Messi. ❤️ pic.twitter.com/o4rdNOGqcq
— Johns. (@CricCrazyJohns) June 29, 2024
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.