मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. या संघाकडून आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. मात्र रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने संघाला तब्बल पाचवेळा ट्रॉफी मिळवून दिली आहे. मात्र तुम्हाला माहित आहे हाच हिटमॅन एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेला होता. याबाबत टीम इंडियाच्या महिला खेळाडूने याबाबत खुलासा केला होता.
2011 चा वर्ल्ड कप सर्वांना माहित आहे जो भारतानेच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली मिळवला होता. 1983 नंतर भारताने वर्ल्ड कपचं स्पप्न साकार केलं होतं. मात्र जेव्हा सर्व देशातील लोकं आनंदात होते तेव्हा हिटमॅन काहीसा डिप्रेस झालेला होता. कारण त्याची वर्ल्ड कप संघामध्ये निवड झाली नव्हती. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्समध्ये बोलताना भारतीय महिला खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने याबाबत सांगितलं.
10 वर्षांनी आता संघाचं कर्णधारपद तुझ्याकडे आहे मात्र तुला माहिती होतं का असं काही होईल?, यावर बोलताना रोहितने मनातलं सर्व काही सांगून टाकलं होतं. 2011 च्या वर्ल्ड कप संघात माझी निवड न झाल्यावर अनेक लोकं मला भेटून गेले होते. मात्र फक्त युवराज सिंह असा होता की ज्याने मला जेवायला घेऊन गेला होता. जवळजवळ एक महिना मी डिप्रेस झाल्याचं रोहित शर्माने सांगितलं.
2011 नंतर एमएस धोनीने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी दिली. यानंतर रोहितचं आयुष्यच बदलून गेलं. या संधीचं रोहितने सोनं केलं आणि मागे वळून काही पाहिलं नाही. 2013 ची चॅम्पिअन ट्रॉफी टीम इंडियाने जिंकली होती ती ICC ची शेवटची ट्रॉफी ठरली होती. रोहित शर्मा 2023 मध्ये संघाला ICC ट्रॉफी मिळवू शकतो.
7 जूनपासून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतातच खेळवला जाणार असल्याने रोहितला इतिहास घडवण्याची मोठी संधी आहे.
दरम्यान, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 500 हून अधिक षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4 शतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 243 वनडेत त्याने 9825 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत.