मुंबई | रोहित शर्मा, अस्सल मुंबईकर. तो मुंबईकर असल्याचं अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून अनेकदा जाणवतं. रोहित त्याच्या हटके आणि विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. रोहित अनेकदा आपल्या टिपीकल अंदाजात उत्तर देतो. रोहितचा हाच दिलखुलास अंदाच त्याच्या चाहत्यांना आवडतो. मात्र रोहित हा विसरभोला आहे, हे विसरुनही चालणार नाही. रोहित क्रिकेट सामन्यासाठी विदेश दौऱ्यावर गेला असताना पासपोर्ट विसरल्याचं अनेकदा सांगितलं जातं. रोहितच्या या विसरभोल्या स्वभावाचा दर्शन चाहत्यांना ऑन कॅमेरा झालं. नक्की काय झालं, हे आपण जाणून घेऊयात.
रोहित शर्मा अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला. रोहितने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आता प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण आहे आणि कोण नाही, हे सांगायची वेळ आली. रोहित इथेच गडबडला. प्रेजेंटेटर मुरली कार्तिक याला प्लेईंग ईलेव्हन सांगताना रोहित चुकला.
अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात कोण खेळत नाहीये, सांगताना रोहितची फजिती झाली. रोहितने यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि आवेश खान या तिघांची नावं बरोबर सांगितली. पण रोहितला चौथं नाव आठवेणा. रोहित आठवण्याचा प्रयत्न करत होता. आपण विसरलोय, हे त्याच्या लक्षात आलं. तो हसायला लागला. तुला मी टॉसआधी सांगितलं होतं, असं रोहित कार्तिकला म्हणाला. यानंतर रोहितला पटकन चौथ्या खेळाडूचं नाव आठवलं. रोहित पटकन म्हणाला कुलदीप यादव.
विसरभोळा रोहित शर्मा
Typical Rohit Sharma moment during the toss😂#RohitSharma𓃵 #INDvsAFG pic.twitter.com/ntWUjdWF4t
— Quantum⁴⁵ Yadav (@45Quantum) January 11, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.