मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामधील झालेल्या सामन्यामध्ये पलटणने विजय मिळवला आहे. हैदराबादच्या संघाने मुंबईला धुतलं आणि 200 धावा केल्या. हैदराबाद संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून कॅमेरून ग्रीन यांचं शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना आपल्या खिशात घातला. या विजयासह रोहित शर्मा याने मोठा इतिहास रचत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
रोहित शर्मा याने 56 धावांच्या अर्धशतकासह मोठे विक्रम रचले आहेत. यामध्ये रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण केल्या आहेत, मुंबई इडिअन्सासाठी खेळताना 5000 धावा तर पलटणचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडिअमवर त्याने 2000 धावा ठोकल्या आहेत.
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आज सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट राखून शानदार विजय मिळवला. कॅमरुन ग्रीनची सेंच्युरी हे मुंबईच्या विजयाच वैशिष्टय ठरलं. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत.
या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचे 16 पॉइंट्स झाले आहेत. मुंबईच्या चाहत्यांच लक्ष आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्सच्या मॅचवर असणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव झाल्यास मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.
मयंक अग्रवाल, विवरांत शर्मा, एडन मार्करम (कॅप्टन), हेनरिक क्लासन, हॅरी ब्रुक, नीतीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल