मुंबई | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या वर्षातील पहिला सामना हा 3 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्याची सांगता झाल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष खास आहे, कारण टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या दृष्टीने बीसीसीआय तयारीला लागल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कपसमोर ठेऊन रोहित शर्माला मोठी जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआय या मालिकेसाठी टीम इंडियाची जबाबदारी ही रोहित शर्माला देणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआय टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही हालचाल करत असल्याची चर्चाही क्रिकेट विश्वात रंगली आहे.
हार्दिक पंड्या हा टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतो. मात्र हार्दिक दुखापतीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. हार्दिकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीममधून आऊट झालाय.
त्यामुळे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र सूर्यालाही दुखापत झालीय. सूर्याला या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितसाठी टीममध्ये कॅप्टन्सीसह कमबॅकसाठी यासारखी दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही.
हिटमॅनचा होकार!
According to InsideSport, Rohit Sharma is likely to lead Team India in the Afghanistan T20I series.
Rohit Sharma is all set to lead Team India in the T20 World Cup too.
Senio BCCI Official said, “We had a lengthy discussion with Rohit and he is ready to lead in T20 World Cup.”… pic.twitter.com/IUegjVl5Ji
— CricketGully (@thecricketgully) January 2, 2024
“आम्ही रोहितसोबत दीर्घ चर्चा केली. त्यानंतर रोहितने टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्यास होकार दिला”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर 3 ते 7 जानेवारी दरम्यान टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे आता या सीरिजसाठी कुणाला संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.