मुंबई | आयसीसीने अवघ्या काही तासांआधी 5 जानेवारी रोजी टी 20 विश्व चषक 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. एकूण 29 दिवस 55 सामने होणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहेत. वर्ल्ड कपचं आयोजन हे 1 जून ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. आयसीसीने संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक हे सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आयसीसीने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी आणि 6 संघांच्या खेळाडूंचा फोटो प्रातिनिधिक स्वरुपात पाहायला मिळत आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कॅनेडा, यूएएस, इंग्लंड, वेस्ट इंडिज, टीम इंडिया आणि पाकिस्तान या 6 टीममधील प्रत्येकी 1 अशा हिशोबाने खेळाडूंचे फोटो आहेत. टीम इंडियाकडून रोहित शर्मा याचा फोटो या पोस्टरवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रोहितचं 11 जानेवारीपासून होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेत कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता रोहितचा फोटो आयसीसीने पोस्टरवर शेअर केल्याने तोच नेतृत्व करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपपासून फारसे या फॉर्मेटमध्ये खेळले नाहीत. मात्र आता हे दोघे टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने टीममध्ये कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातंय. हे दोघे अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतून परततील, अशी शक्यता आहे. टीम इंडियाची टी 20 मध्ये नियमितपणे हार्दिक पंड्या कॅप्टन्सी करतो. मात्र त्याला दुखापत झालीय. तसेच सूर्याला नेतृत्वाचा पुरेसा नाही, मात्र अनुभव आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध रोहितलाच कॅप्टन्सीची सूत्र मिळतील. या सीरिजपासूनच टीम इंडिया वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहेत.
टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पोस्टरवर रोहितचा फोटो
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
रोहितला नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वात अनेक खेळाडू खेळलेत. रोहित कर्णधार म्हणून खेळाडूंना मैदानात त्यांचा नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देतो. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांचीही रोहितला कॅप्टन म्हणून पसंती आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट काय ‘खेळी’ करते, हेच पाहणं औत्सुक्यातं असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 5 जून, न्यूयॉर्क.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 9 जून, न्यूयॉर्क.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए, 12 जून, न्यूयॉर्क.
टीम इंडिया विरुद्ध कॅनेडा, 15 जून, फ्लोरिडा.