टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन टॉप 4 मध्ये एन्ट्री केली. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. गेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाकडे त्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यानंतर सेमी फायनलसाठी गेमप्लान जाहीर केला आहे. उभयसंघात 27 जून रोजी सामना होणार आहे. रोहितने कांगारुंना लोळवल्यानंतर इंग्लंडला एकाप्रकारे आव्हानच दिलं आहे. आमच्या टीमची खेळण्याची पद्धत बदलणार नसल्याचं रोहितने म्हटंल. आतापर्यंत जसा खेळ राहिला आहे, तसंच पुढेही पाहायला मिळेल, असंही रोहितने सांगितलं.
“आमच्यासाठी काहीही बदलणार नाही. आम्ही एक टीम म्हणून काय करु शकतो, यावरच लक्ष केंद्रीत करु इच्छितो”, असं रोहितने सांगितलं. तसेच रोहितला बाद फेरीमध्ये खेळण्याच्या दृष्टीकोणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर रोहितने म्हटलं की आम्ही निर्भयपणे वैयक्तिक खेळण्याऐवजी टीमच्या फायद्याच्या हिशोबाने खेळतोय आणि पुढेही असंच खेळणार.
“आम्ही अशाच प्रकारे खेळू इच्छितो. परिस्थितीनुसार काय करायचं हे आम्ही समजतो. खेळाडूंनी कोणत्याही दबावाखाली न खेळता फ्री खेळावं. आम्ही आतापर्यंत तसंच करत आलो आहोत आणि सेमी फायनलमध्येही तसंच करण्याचा प्रयत्न करु. हे चांगलं राहिल”, असा विश्वास रोहित शर्मा याने व्यक्त केला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.