Rohit Sharma : शिवम दुबेला वर्ल्ड कप टीममध्ये का घेतलं? रोहितचं सडेतोड उत्तर?

| Updated on: May 02, 2024 | 6:16 PM

Rohit Sharma On Shivam Dube World Cup 2024 Selection : शिवम दुबेला वर्ल्ड कप संघात फक्त एकच कारणामुळे संधी दिल्याचं रोहित शर्माने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.

Rohit Sharma : शिवम दुबेला वर्ल्ड कप टीममध्ये का घेतलं? रोहितचं सडेतोड उत्तर?
rohit sharma and shivam dube,
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन 1 ते 29 जून दरम्यान यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 20 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कपसाठी एक महिन्याआधी सर्व क्रिकेट टीमने आपल्या पथकाची घोषणा केली. बीसीसीआय निवड समितीने 30 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने मुख्य संघात 15 आणि राखीव म्हणून 4 खेळाडूंना संधी दिली. निवड समितीने रिंकू सिंह आणि शुबमन गिल या दोघांना राखीव म्हणून संधी दिली. तर केएल राहुल याला वगळण्यात आलं. तसेच मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे याला संधी देण्यात आली.

वर्ल्ड कप संघ जाहीर झाल्यानंतर निवड समितीच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. रिंकूला मुख्य संघात स्थान न दिल्याने काहींनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला. तर दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या 17 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवम दुबे याला संधी मिळाली. वर्ल्ड कप संघ जाहीर झाल्यानंतर 2 दिवसांनी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

शिवमच्या निवडीबद्दल रोहित काय म्हणाला?

रोहित शर्माला या पत्रकार परिषदेदरम्यान शिवम दुबेच्या निवडीबाबत प्रश्न करण्यात आला. यावर रोहितने सडेतोड उत्तर देत या प्रश्नाला पूर्णविराम लावला. “आम्हाला मिडल ऑर्डरमध्ये एक बॅट्समन पाहिजे होता, जो बिंधास्त आणि काळजी न करता मोठे फटके मारू शकतो, म्हणूनच आम्ही शिवम दुबेची निवड केली”, असं रोहितने म्हटलं.

रोहितची शिवमबाबत प्रतिक्रिया

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान