मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या भारताच्या (Indian Cricket Team) तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर याच महिन्यात त्याच्याकडे कसोटी संघाची कमानही सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये वेस्ट इंडिजला एकही सामना जिंकू दिला नाही. आता टीम इंडियासमोर श्रीलंकेचं (Sri Lanka Cricket Team) आव्हान आहे, या संघाविरुद्ध लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. दुसरा सामना शनिवारी धर्मशाला येथे होणार असून येथे रोहित इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
रोहितच्या नेतृत्वाची सर्वांनाच कल्पना आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच जेतेपदं पटकावली आहेत. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत रोहित नेतृत्व करत असे आणि तेव्हाही तो खूप यशस्वी ठरला आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली असून तो आता इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. रोहितने मायदेशात म्हणजेच भारतात 16 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 15 सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत मायदेशात सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहित मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या बरोबरीने उभा आहे. जर भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली धरमशाला येथे विजय मिळवला, तर तो या दोघांना मागे टाकून घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा कर्णधार बनेल.
घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहितने भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना आधीच मागे टाकलं आहे. रोहितने विराटपेक्षा दोन सामने आणि धोनीपेक्षा 5 सामने जास्त जिंकले आहे.
इतर बातम्या
IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा