Rohit Sharma: रोहितच्या निवृत्तीचं कारण काय? पाहा ‘हिटमॅन’ काय म्हणाला?

| Updated on: Jun 30, 2024 | 8:42 PM

Rohit Sharma On Retirement: रोहित शर्माने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृत्तीबाबत रोहितच्या डोक्यात काय विचार सुरु होते? पाहा व्हीडिओ

Rohit Sharma: रोहितच्या निवृत्तीचं कारण काय? पाहा हिटमॅन काय म्हणाला?
team india rohit sharma press
Follow us on

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात पहिल्यांदा टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवून दिली. रोहितसेनेने वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाने 176 धावांचा शानदार बचाव करत 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. टीम इंडिया 17वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप तर 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने अखेरचा टी 20 वर्ल्ड कप 2007 साली तर आयसीसी ट्रॉफी 2013 जिंकली होती. त्यानंतर आता रोहितने कॅप्टन्सीत वर्ल्ड कप स्पर्धेत इंडियाला विजयी केलं.

रोहितने वर्ल्ड कप विजयानंतर विराट कोहलीच्या पाठोपाठ टी20i क्रिकेकमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय एका बाजूला वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष करत असताना दुसर्‍या बाजूला टीम इंडियाचे 2 दिग्गज निवृत्त झाले. जेव्हा क्रिकेट चाहत्यांना विराट-रोहितच्या निवृत्त झाल्याचं माहित झालं, तेव्हा त्यांना एकच धक्का बसला. आता रोहितने एकाएकी निवृत्तीचा निर्णय का घेतला? त्याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

रोहितने काय सांगितलं?

“मी विचार केला नव्हता की टी20i मधून निवृत्त व्हावं. पण, परिस्थिती अशी आली की मी विचार केला की ही निवृत्त होण्यासाठी योग्य वेळ आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपसह अलविदा करण्यासाठी यासारखी कोणती उत्तम वेळ नाही”, असं रोहितने नमूद केलं. रोहितच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कॅप्टनची निवृत्तीनंतरची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.