IND vs AUS : “एकटा बुमराह सर्व विकेट्स…”, कॅप्टन रोहितने इतर गोलंदाजांना सुनावलं, पाहा व्हीडिओ

| Updated on: Dec 08, 2024 | 4:53 PM

Rohit Sharma On Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय गोलंदाजांचे कान टोचले आहेत. रोहितने मोहम्मद सिराजसह इतर गोलंदाजांचं नाव घेत स्पष्ट म्हणाला. पाहा व्हीडिओ.

IND vs AUS : एकटा बुमराह सर्व विकेट्स..., कॅप्टन रोहितने इतर गोलंदाजांना सुनावलं, पाहा व्हीडिओ
rohit sharma press conference
Follow us on

टीम इंडियाला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. न्यूझीलंडने भारताचा मायदेशात3-0 ने व्हाईटवॉश केला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसर्‍या सामन्यात 10 विकेट्सने धुव्वा उडवत पलटवार केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला. जसप्रीत बुमराह याने पहिल्या सामन्यात दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र बुमराहला या दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सच घेऊ शकला तर सिराजनेही चौघांनां मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नितीश रेड्डी आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. पराभवानंतर कॅप्टन रोहितला बुमराहच्या बॉलिंगबाबत प्रश्न करण्यात आला. रोहितने यावेळेस सडेतोड उत्तर दिलं.

रोहित शर्माने काय म्हटलं?

“जसप्रीत बुमराह एकटा सर्व जबाबदारी घेऊ शकत नाही. इतर सर्व खेळाडूंनाही पुढे येत जबाबादारी घ्यावी लागेल. कारण, कधी कधी बुमराह यालाही विकेट मिळणार नाहीत, त्यामुळे तेव्हाही इतर गोलंदाजांनी पुढे येत त्यांना त्यांची भूमिका बजावावी लागेल”, असं रोहित शर्मा याने नमूद केलं.

बुमराहला विकेट मिळणार नाही असं अनेकदा होऊ शकतं तेव्हा इतरांनी पुढे यायला हवं. जसं आम्ही बॅटिंगबाबत बोलतो तेव्हा तुम्ही कुणा एकावर निर्भर राहु शकत नाहीत. संघात प्रत्येकाला पुढे येत त्याची भूमिका बजावावी लागेल. कुणी एक व्यक्ती कसोटी मालिका जिंकून देऊ शकत नाही. कसोटी मालिका जिंकायची असेल तर प्रत्येकाने त्याची भूमिका बजावावी लागेल”, असं रोहितने म्हटलं.

रोहितने इतर गोलंदाजांना सुनावलं

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.