मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पाकिस्तानचा गोलंदाजी अटॅक पाहता भारतावर हावी होतील, असा अंदाज क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी हा अंदाज फोल ठरवला आहे. पहिल्या गड्यासाठी दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकंही झळकावली. सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या या जोडीने नंतर आक्रमक पवित्रा दाखवला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजी पुरते हतबल दिसून आले. रोहित शर्मा याने आपल्या वनडे कारकिर्दीतलं 50 वं अर्धशतक झळकावलं . रोहित शर्मा याने 42 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
रोहित शर्मा याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने झटपट अर्धशतक झळकावलं. सुरुवातीला अडखळत खेळत होता. मात्र त्यानंतर आपला आक्रमक पवित्रा दाखवत थेट गोलंदाजांवर दबाव आणला. पण शादाब खानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटा मारण्याच्या नादात झेल बाद झाला. फहीम अश्रफने त्याचा झेल घेतला. दुसरीकडे रोहित शर्मा याने अर्धशतकांचं अर्धशतकही पूर्ण केलं आहे. वनडे कारकिर्दित त्याच्या नावावर 50 अर्धशतकांची नोंद झाली आहे.
5⃣0⃣th ODI FIFTY! 🙌 🙌
Captain Rohit Sharma marches past the half-century in 42 balls 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/kg7Sh2t5pM#TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/HDpd0yj16N
— BCCI (@BCCI) September 10, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.