बंगळुरु | टीम इंडियाची अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या 2 सामन्यातील मॅचविनर खेळाडू शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे स्वस्तात माघारी परतले. तर विराट कोहली आणि संजू सॅमसन दोघेही पहिल्याच बॉलवर झिरोवर आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 5 ओव्हरच्या आतच 4 बाद 22 अशी स्थिती झाली. मात्र कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव सावरला. रोहितने संधी मिळेल तसे फटके मारले आणि अर्धशतक झळकावलं.
रोहितला पहिल्या दोन्ही सामन्यात एकही धाव करता आली नाही. त्यामुळे रोहितवर तिसऱ्या सामन्यात खातं उघडण्याचं एक वेगळाच दबाव होता. रोहितने खातं उघडलं. तसेच काही फटके मारले. झटपट 4 विकेट्स गेल्यानंतर रोहितने रिंकू सिंह याच्यासह मोठे फटके मारत अर्धशतक झळकावलं. रोहितने रिव्हर्स स्वीपच्या मदतीने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हे 30 वं अर्धशतक ठरलं.
रोहितने 41 बॉलमध्ये या 50 धावा पूर्ण केल्या. रोहितने या दरम्यान 121.95 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. तसेच रोहितने या खेळीत 5 खणखणीत चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार लगावले. टीम इंडियाचा आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या आधीचा हा अखेरचा टी 20 सामना आहे. रोहितने या सामन्यात ही खेळी करुन आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असतो, हे दाखवूनच दिलं आहे. आता टीम इंडिया अफगाणिस्तानसमोर किती धावांचं आव्हान ठेवतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
रोहित शर्मा याची खणखणीत फिफ्टी
3⃣0⃣th T20I half-century for @ImRo45! 🙌 🙌
Captain leading from the front 👌 👌
100 up for #TeamIndia. 👍👍
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwO9wd #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/O293hKHWF9
— BCCI (@BCCI) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.