IND vs PAK | Rohit Sharma चा पाकड्यांना तडाखा, फक्त इतक्या बॉलमध्ये धमाकेदार अर्धशतक

| Updated on: Oct 14, 2023 | 7:34 PM

India vs Pakistan Rohit Sharma | रोहित शर्मा याने अफगाणिस्ताननंतर पाकिस्तान विरुद्ध तडाखेदार खेळी करत शानदार अर्धशतक ठोकलंय.

IND vs PAK | Rohit Sharma चा पाकड्यांना तडाखा, फक्त इतक्या बॉलमध्ये धमाकेदार अर्धशतक
Follow us on

अहमदाबाद | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. रोहितने 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हे अर्धशतक केलंय. रोहितने या अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. रोहितने अनेक नेत्रदीपक शॉट मारले. रोहितने या फटकेबाजीसह टीम इंडियाला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं आहे. विशेष म्हणजे रोहितने नेट रनरेटच्या हिशोबाने झटपट अर्धशतक पूर्ण केलंय.

रोहितने 36 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने या दरम्यान 4 सिक्स आणि 3 चौकार ठोकले. म्हणजेच रोहितने अवघ्या 7 बॉलमध्ये 36 धावा केल्या. रोहितने 138.89 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या वनड कारकीर्दीतील हे 53 वं अर्धशतक ठरलं. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध अशीच तडाखेदार शतकी खेळी करत टीम इंडियाला विजयी केलं होतं. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 131 धावांची खेळी केली होती. रोहितने या शतकासह अनेक विक्रम हे मोडत काढले होते.

पाकिस्तानची बॅटिंग

दरम्यान टीम इंडियाच्या बॅटिंगआधी पाकिस्तानने बॅटिंग केली. पाकिस्तानला टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तान 42.5 ओव्हरमध्ये 191 ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर मोहम्मद रिझवान याने 49 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या पाच जणांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

रोहितचं सलग दुसरं अर्धशतक


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.