कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 37 वा सामन्यात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. युवा शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ओपिनिंग जोडी मैदानात बॅटिंगसाठी आली. या दोघांनी दे दणादण फटकेबाजी करत आक्रमक सुरुवात केली. या जोडीने अवघ्या 4.3 ओव्हरमध्येच 50 धावा पूर्ण केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 5.4 ओव्हरमध्ये 62 धावांनी नाबाद भागीदारी केली.
रोहित आणि शुबमन या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. एका बाजूने रोहित दक्षिण आफ्रिकाच्या गोलंदाजांना झोडत होता. तर गिलही संधी मिळेल तसा खेळत होता. मात्र अखेर कगिसो रबाडा यानेही जोडी फोडली. रोहित शर्मा 24 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. रोहितने या दरम्यान मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा सिक्सर किंग ठरलाय.
रोहित वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरलाय. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्याआधी सर्वाधिक सिक्सबाबत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि रोहित यांच्या नावावर समसमान 20 सिक्स होते. मात्र रोहितने दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिलाच सिक्स ठोकताच रोहित वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणार बॅट्समन ठरला. रोहितने 8 सामन्यात ही कामगिरी केलीय.
दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र दक्षिण आफ्रिकाने एक बदल केलाय. गेराल्ड कोएत्झी याच्या जागी तरबेझ शम्सी याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.