Video : अमित मिश्रा याला टोमणा मारताच चर्चा वेगळ्या वळणावर, रोहित शर्मा याने ऑनएअर बोलणंच केलं बंद

| Updated on: Sep 27, 2023 | 3:22 PM

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. तिसऱ्या सामन्यात दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केलं असून रोहित शर्मा नेतृत्व करत आहे. या सामन्यापूर्वी अमित मिश्रा आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा झाली आणि...

Video :  अमित मिश्रा याला टोमणा मारताच चर्चा वेगळ्या वळणावर, रोहित शर्मा याने ऑनएअर बोलणंच केलं बंद
या यादीमध्ये अमित मिश्रा दुसऱ्या स्थानावर असून त्याने 23.60 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत,
Image Credit source: Viral Video Grab
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-0 ने पराभूत उभारी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून व्हाइट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा याला आराम देण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पुनरागमन केलं असून सराव सत्रात भाग घेतला. सामन्यात रोहित शर्मा याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यात चर्चा झाली. या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्णधार रोहित शर्मा याने अमित मिश्रा याची फिरकी घेतली.

अमित मिश्रा आणि रोहित शर्मा यांच्यात काय झाली चर्चा?

अमित मिश्रा यांच्याकडे पाहात रोहित शर्मा याने सांगितलं की, ‘डोळे लाल का आहेत?’ त्यावर अमित मिश्रा याने उत्तर देताना म्हंटलं की, ‘मी रात्रभर झोपलो नाही. तीन तासच झोप घेतली.’ यावर रोहित शर्मा याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच आवाक् झाले. ‘काय कमिटमेंट आहे. इतकं कमिटमेंट तर तिथे (फिल्डवर) पण नव्हतं.’ रोहित शर्मा इतक्यावरच थांबला नाही. ‘मिश्रा हा फिरकीपटू आहे की तो माझ्या नेतृत्वात कधी खेळलाच नाही.’ मिश्राने या चर्चेनंतर लगेचच उत्तर देत म्हणाला की, तू कधी बोलवलंच नाहीस. यानंतर रोहित शर्मा याने माइक ब्रॉडकास्टरकडे सोपवला आणि चर्चा थांबवली.

आयपीएल 2023 मध्ये अमित मिश्रा लखनऊ सुपर जायन्ट्सकडून खेळला. सात सामने खेळला आणि बऱ्यापैकी विकेट्स घेतल्या. अमित मिश्रा 2017 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारतासाठी शेवटचा टी20 सामना इंग्लंड विरुद्ध खेळला होता. तसेच हरयाणाकडून लिस्ट ए मध्ये 2019 मध्ये खेळला होता.

तिसऱ्या वनडे सामन्यातही अक्षर पटेल खेळला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप संघात त्याच्याऐवजी आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण तिसऱ्या सामन्यात आर. अश्विन याला आराम देण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर ही खेळाडूंची अंतिम नावं निश्चित करण्यासाठी शेवटची तारीख आहे.