Video : रोहित शर्मा याचं नशिबच फुटकं, कडक शॉट मारला खरा पण मॅक्सवेलच्या हातात बसला

| Updated on: Sep 27, 2023 | 8:17 PM

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने तुफान खेळी केली. 57 चेंडूत 81 धावांची खेळी केली. पण ग्लेन मॅक्सवेल याला नशिबाची साथ मिळली. नेमकं काय झालं ते पाहा

Video : रोहित शर्मा याचं नशिबच फुटकं, कडक शॉट मारला खरा पण मॅक्सवेलच्या हातात बसला
IND vs AUS : रोहित शर्मा याची वादळी खेळी एका फटक्यात संपली, ग्लेन मॅक्सवेलला मिळाली नशिबाची साथ Watch Video
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 352 धावांची खेळी केली. तसेच भारतासमोर विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं. विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी मैदानात उतरली. वॉशिंग्टन सुंदर काही खास करू शकला नाही. पण रोहित शर्मा याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रोहित शर्मा याने 57 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याची शतकी खेळीकडे वाटचाल सुरु होते. तसेच आक्रमक फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाज हैराण झाले होते. पण ग्लेन मॅक्सवेल याला नशिबाची साथ मिळाली. हिटमॅन रोहित शर्मा याची विकेट घेण्यात मॅक्सवेलला यश आलं. ही विकेट गेली तेव्हा ग्लेन मॅक्सवेल यालाही विश्वास बसला नाही. कारण रोहित शर्मा याचा झेल त्याचा हातात बसला याबाबत त्याने आश्चर्य व्यक्त केलं.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने संघाचं 21 वं षटक ग्लेन मॅक्सवेल याला सोपवलं. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा तुटून पडला. कोहलीने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर विराटने एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. त्यानंतर रोहित शर्माने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर सहावा चेंडू एकदम जोरात मारला. चेंडू इतक्या जोरात मारली की फॉलो थ्रूमध्ये मॅक्सवेलच्या हातात बसला.

पहिल्यांदा मॅक्सवेलला विश्वासच बसला नाही की झेल घेतला आहे. पण रोहित शर्मा याचं नशिबच फुटकं होतं. त्यामुळे शतक होता होता राहिल. 81 धावांवर रोहित शर्माची इनिंग संपली. ग्लेन मॅक्सवलने त्यानंतर विराट कोहली यालाही बाद केल. ग्लेन मॅक्सवेलने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने दिलेलं विजयी धावांचं आव्हान गाठणं आता मधल्या फळीच्या फलंदाजांवर आलं आहे. आता केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळीकडे लक्ष असणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा