मुंबई : भारत आणि नेदरलँड्समधील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने तब्बल 160 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 250 धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून रविवारी झालेल्या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी बॉलिंग केली. कप्तान रोहित शर्माने एक ओव्हर टाकली, यामध्ये त्याने विकेटही घेतली. रोहितच नाहीतर विराटनेही विकेट घेत सर्वांचं मनोरंजन केलं. रोहित शर्माला आधीच्या बॉलवर सिक्स बसला होता त्यानंतर गड्याने दमदार कमबॅक केलं.
रोहित शर्मा याने नेदरलँड्सच्या तेजा निदामनुरुला आऊट करत ऑल आऊट केलं. रोहितने 48 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग घेतली होती. रोहितला या ओव्हरमध्ये सिक्स बसला त्यानंतर पूढच्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. तेजा निदामनुरु मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग ऑनला कॅच उडाला, तो कॅच मोहम्मद शमीने पकडत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रोहितने शेवटची बॉलिंग वन डे क्रिकेटमध्ये 9 वर्षांआधी केली होती. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. रोहितशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलही नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करताना दिसले. कोहलीने तीन ओव्हरमध्ये 13 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला आऊट केलं.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.